महाविकास आघाडीत पेच निर्माण; काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता बंडखाेरीच्या तयारीत

सोलापूर : काँग्रेसचे(Congress) माजी आमदार दिलीप माने यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघात उमेदवारी मिळण्यासाठी सिंहगर्जना केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून दिवसरात्र कार्यकर्ते मतदारांमध्ये जाऊन काम करत आहेत. दक्षिण मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे.

या बाल्लेकिल्यात काँग्रेसला(Congress) विश्वासात न घेता शिवसेना उबाठा गटानी परस्पर उमेदवारी देऊन एबी फॉर्म दिले असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळी आहे. माझ्या वडीलांवर बंडखोरीची वेळ आली होती तशीचं वेळ माझ्यावर आली आहे. माझा अंत पाहू नका नाही तर जिल्ह्यातील ११ मतदारसंघात बंडखोर उभे करेन, असा थेट इशारा दिलीप माने यांनी शुक्रवारी दिला. त्यांच्या या इशाऱ्याने महाविकास आघाडीत पेच निर्माण झाला आहे.

दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर होत नसल्याने अस्वस्थ कार्यकर्त्यांनी माने यांच्या निवासस्थानी हजारोंच्या संख्येनी गर्दी केली. दिलीप माने तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है। असा नारा देत कार्यकर्त्यानी घोषणा दिल्या. वातावरण तणावपूर्ण होत असताना काँग्रेसचे शहरध्यक्ष चेतन नरोटे यांनी माने यांच्या निवासस्थानी भेट देत संतप्त कार्यकर्त्याना शांत केले.

अमर पाटील यांना शिवसेना उबाठाने उमेदवारी जाहीर करुन एबी फॉर्मही दिला. याच दरम्यान काही खलबते झाली. दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांनी बैठकांचा सपाटा सुरु केल्यावर काँग्रेसच्या हालचाली गतिमान झाल्या आणि माने यांना उमेदवारीसह एबी फॉर्म प्रणिती शिंदे यांच्याकडे सपूर्द केल्याचा निरोप शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना मिळाला. याची माहिती मिळताच माने समर्थकांसह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

दरम्यान शिवसेनेचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांनी ही जागा सेनेचीच आहे. अमर पाटील यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिल्याचे सांगितले. यामुळे दक्षिणच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी माजी दिलीप माने यांच्या समर्थकांनी विधानसभेच्या निवडणुकीविषयी माने यांनी निर्णय घ्यावेत यासाठी बैठक घेतली. ही बैठक संपता क्षणी माने यांना उमेदवारी जाहीर केल्याची माहिती प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना दिली आणि याचवेळी शहराध्यक्ष नरोटे यांनी देखील माजी माने यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगताच मोठा जल्लोष सुरू झाला.

यावेळी काँग्रेसचे(Congress) शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, जयकुमार माने, पृथ्वीराज माने, वसंतराव पाटील, श्रीशैल पाटील, गंगाधर बिराजदार, शावरप्पा वाघमारे, अप्पासाहेब काळे, सतिश दरेकर, आशिम शेख, शैलजा राठोड, सचिन व्हनमाने, योगीराज दिंडोरे, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कुबसंगे, रावसाहेब पाटील, प्रथमेश पाटील, माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, सचिन गुंड, सिध्दाराम व्हनमाने, नंदकुमार अंत्रोळीकर, सरपंच जयश्री सगरे, विठ्ठल पाटील, शकील कुडले, माजी सरपंच कोमल करपे, लता जावीर, सुनील जाधव, प्रताप टेकाळे, नागण्णा बनसोडे, राहुल जाधव, अरुणकुमार बिराजदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

महाविकास आघाडीतील नेत्यांची चर्चा झाल्यानंतरच शिवसेना उबाठाची उमेदवारी अमर पाटील यांना देण्यात आली आहे. दिलीप माने यांच्याबाबत झालेला निर्णय कोणी घेतला. नाना पटोले, संजय राऊत, जयंत पाटील यांनी सांगितला का? दक्षिणची उमेदवारी अमर पाटलांनाच राहणार आहे. उमेदवारी बदलण्याचा विषयच नाही.

प्रणिती शिंदे आमच्या नेत्या आहेत. त्यांचा निरोप चेतन नरोटे यांच्यामार्फत मिळालेला आहे. त्यांच्यावर माझा विश्वास आहे. संजय राऊत यांनीही काही जागांबाबत निर्णय चुकला असेल तर दुरुस्ती करण्यात येईल असे सांगितले होते. माझ्याबाबत झालेला हा निर्णय कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा आहे

हेही वाचा :

रोमँटिक डेटला जाणं तरुणाला पडलं महागात!

ऐन सणासुदीत एसटी कर्मचाऱ्यांना बसतोय फटका; दिवाळी भेट तर नाहीच

दिवाळीनंतर अंधार होईल इतकी राज्याची तिजोरी साफ केलीय; विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका