शेअर बाजारात 2024 मध्ये अनेक कंपन्यांचे आयपीओ(IPO) लिस्ट झाले आहेत. एका पाठोपाठ छोट्या मोठ्या कंपन्यांचे आयपीओ शेअर मार्केटमध्ये येत आहेत. यापैकी अनेक आयपीओंनी गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत.
दिवाळीच्या ब्रेकनंतर मोठ्या प्रमाणात आयपीओ(IPO) शेअर मार्केटमध्ये येणार आहेत. यामध्ये स्विगी, एनटीपीसी ग्रीन एनर्जी आणि मोबिक्विक सारख्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. सेबीकडून या कंपन्यांच्या आयपीओला परवानगी यापूर्वीच मिळाली आहे.
स्विगी
स्विगीचा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी 6 नोव्हेंबराल खुला होईल. स्वीगीचा आयपीओ जवळपास 11800 कोटी रुपयांचा असेल. यामध्ये ऑफर फॉर सेलद्वारे शेअरची विक्री केली जाईल. या आयपीओवर झोमॅटोची देखील नजर असेल.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील नवीकरणीय ऊर्जा कंपनी एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ देखील लवकरच येणार आहे. एनटीपीसीच्या आयपीओवर देखील गुंतवणूकदारांचं लक्ष लागलंय.
एक्मे सोलर होल्डिंग्स
एक्मे सोलर होल्डिंग्स हीं कंपनी सौर ऊर्जा प्रकल्प चालवते.इंजिनियरिंग, प्रोक्यूरमेंट, कंस्ट्रक्शन, ऑपरेशन्स आणि मेंटेनेंस देखील करते. एक्मे सोलर होल्डिंग् केंद्र आणि राज्य सरकारला वीज विकून उत्पन्न मिळवते.
निवा बूपा हेल्थ इन्शुरन्स
निवा बूपा आरोग्य विमा कंपनी आहे. आरोग्य विमा क्षेत्रात या कंपनीचा वाटा 16.24 टक्के आहे. स्टार हेल्थनंतर आयपीओ आणणारी ही दुसरी कंपनी आहे.
वन मोबिक्विक सिस्टीम्स
मोबिक्विक ची स्थापना बिपिन प्रीत सिंह आणि उपासना टाकू यांनी केली होती. क्यूआर, ईडीसी मशीन आणि मर्चंट कॅश अँडव्हान्स सारख्या सेवा पुरवतात. या कंपनीची उपकंपनी झाकपे ईकॉमर्स कंपन्यांना पेमेंट गेटवे सर्व्हिस पुरवते. मोबिक्विकचा आयपीओद्वारे 700 कोटी उभारण्याचा प्रयत्न आहे.
सागिलिटी इंडिया
या कंपनीची स्थापना 2021 मध्ये बंगळुरुत झाली होती. आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांसाठी व्यवस्थापन सेवा पुरवण्याचं काम ही कंपनी करते.
झिंका लॉजिस्टिक्स
ही कंपनी ट्रक ऑपरेटर्सला वेगवेगळ्या सेवा पुरवते. या कंपनीचा आयपीओद्वारे 550 कोटी रुपयांची उभारणी करण्याचा प्रयत्न आहे. पेमेंट मॅनेजमेंट, टेलीमेटिक्स आणि वाहन वित्त सेवा पुरवते. कंपनीनं मार्च 2024 पर्यंत जवळपास 200 कोटींच्या कर्जाचं वाटप केलं आहे.
हेही वाचा :
विजांच्या कडकडाटात दिवाळीचं स्वागत; पावसाच्या हजेरीनं उत्साहावर विरजण
खेड शिवापूर टोलनाक्यावर एक कोटींचा गुटखा जप्त; कर्नाटकातून पुण्यात विक्रीचा प्रयत्न फसला
लहान भावाने मोठ्या केलीभावाची हत्या; आईने साक्ष फिरवली, तरीही कोर्टाने सुनावली जन्मठेप