मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात पोहोचलेल्या कलाकार म्हणजे अभिनेत्री(Actor) नीना कुळकर्णी. त्यांनी अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. नीना कुळकर्णी यांनी त्यांच्या वास्तववादी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/10/image-518.png)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री(Actor) नीना कुळकर्णी यांच्या निधनाच्या बातम्या समोर येत असून सोशल मीडियावर त्या व्हायरल केल्या जात आहे. यावर अनेकांनी दु:ख आणि संवेदनाही व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री नीना कुळकर्णी या जिवंत असून त्यांनी निधनाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचं सांगत स्वत: जिवंत असल्याची ग्वाही दिली आहे. नीना कुळकर्णी यांचं निधन झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यूट्यूबर नीना कुळकर्णी यांचं निधन झाल्याची खोटी बातमी पसरवण्यात आली आहे.
दरम्यान, या व्हायरल बातम्या आणि अफवांना कंटाळून नीना कुळकर्णी यांनी यावर मौन सोडलं आहे. निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचं नीना कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. नीना कुळकर्णी यांनी सोशल मीडियावरील अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.
नीना कुळकर्णी यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांसंदर्भात पोस्ट करत लिहिलंय, “यूट्यूबरवर माझ्या निधनाची खोटी बातमी दाखवली जात आहे. देवाच्या कृपेने मी जिवंत आहे आणि पूर्णपणे ठणठणीत असून कामामध्ये व्यस्त आहे. कृपया अशाप्रकारच्या अफवांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांना प्रोत्साहनही देऊ नका. मला दीर्घायुष्य मिळू दे”.
हेही वाचा :
हसन मुश्रीफांच्या रॅलीत संजय मंडलिकांची मोठी घोषणा
चक्र बदलणार! देशात जनगणना कधी होऊ शकते?
हृतिकच्या एक्स वाईफचं बॉयफ्रेंडसोबत लिपलॉक, मुलांसमोर पार्टनरला KISS Video