इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या मेगा ऑक्शनच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. यामध्ये आता कोणता संघ खेळाडूंना कायम ठेवणार आणि कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार यावर आता मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयपीएल 2025 रिटेन्शनबाबत(retention) जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/10/image-518.png)
सर्व फ्रँचायझी 31 नोव्हेंबरपर्यंत बीसीसीआयला त्यांच्या कायम ठेवण्याच्या याद्या सादर करतील. त्यानंतर मेगा लिलावात कोणती मोठी नावे सहभागी होणार आहेत, हे चित्र स्पष्ट होईल. या मेगा लिलावावर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की त्यांची फ्रेंचायझी कोणते खेळाडू कायम ठेवेल. काही खेळाडूंची नावे जवळपास निश्चित झाली असली तरी काही मोठ्या नावांवर सस्पेन्स आहे.
आयपीएल २०२५ च्या ऑक्शनच्या संदर्भात अनेक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आगामी आयपीएल २०२५ च्या ऑक्शन साठी प्रचंड उत्सुक आहेत. लवकरच आयपीएल २०२५ च्या ऑक्शनचे ठिकाण आणि तारीख बीसीसीआय जाहीर करणार आहे.
बीसीसीआय राखीव यादी सादर करण्याची तारीख ३१ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. रिटेंशनचे(retention) लाइव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टार किंवा सोनीवर दिसणार नाही, तर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema वर असेल. जिथे तुम्हाला संपूर्ण माहिती मोफत मिळू शकते. आयपीएल २०२५ च्या रिटेन्शनची लाइव्ह स्ट्रिमिंग दुपारी 4:30 वाजल्यापासून सुरू होईल.
IPL RETENTION SHOW FROM 4.30PM ON 31ST OCTOBER. pic.twitter.com/hAz2CVB17L
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2024
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी, अनेक मोठ्या खेळाडूंबद्दल मीडिया रिपोर्ट्स येत आहेत की ते खेळाडू यावेळी सोडले जाऊ शकतात. यामध्ये अनेक मोठ्या भारतीय संघामधील त्याचबरोबर मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्स सारख्या दिग्गज संघ ज्यांनी आयपीएलचे पाच जेतेपद नावावर केले आहेत. त्या संघामध्ये अनेक मोठे उलटफेर पाहायला मिळू शकतात. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत, केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. आता हे खेळाडू यावेळच्या मेगा लिलावात खरोखरच सहभागी होणार का हे पाहायचे आहे.
मेगा लिलावापूर्वी, प्रत्येक संघ 6-6 खेळाडूंना कायम ठेवू शकतो. ज्यामध्ये संघ राईट टू मॅच कार्ड देखील वापरू शकतो. RTM 5 पर्यंत कॅप्ड खेळाडू दर्शवू शकतात. याशिवाय आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नवीन सुरुवात होत आहे. ज्यामध्ये सामना खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 7.5 लाख रुपये फी दिली जाईल.
हेही वाचा :
महाविकास आघाडीत पुन्हा ‘सांगली पॅटर्न’…
सायबर क्राईम चे आव्हान
वृद्धांसाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा! पंतप्रधान मोदींकडून आरोग्य विमा जाहीर, कसा कराल अर्ज?