आता साऊथ सिनेमा(film) इंडस्ट्रीमधले दोन दिग्गज एकत्र येऊन एक बिग बजेट सिनेमा करण्याच्या तयारीत आहेत. त्या अनुषंगानं त्यांची तयारी देखील झाल्याची माहिती मिळत आहे. ही जोडी म्हणजे, सुपरडुपर हीट सिनेमे तयार करणारे दिग्दर्शक राजामौली आणि साऊथ सुपरस्टार महेश बाबू.
दिग्दर्शक राजामौली आणि साऊथ सुपरस्टार महेश बाबू यांचा आगामी चित्रपट(film) SSMB29 बाबत दररोज काहीना काही अपडेट्स येत असतात. काही दिवसांपूर्वीच महेश बाबू या चित्रपटासाठी खूपच मेहनत घेत असल्याच्या बातम्या समोर आलेल्या. तसेच, या चित्रपटात AI चा वापर केला जाणार असल्यानं राजामौली AI टेक्नॉलॉजीचा प्रशिक्षण घेत असल्याचंही समोर आलं होतं. याशिवाय राजामौली सध्या केनियामध्ये आपल्या चित्रपटासाठी हटके लोकेशनच्या शोधात आहेत, अशी माहिती मिळत आहे. एकंदरीतच सांगायचं तर महेश बाबू आणि राजामौली दोघांनीही या चित्रपटासाठी कंबर कसली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी चित्रपट SSMB29 एक जंगल अॅडव्हेंचर चित्रपट असणार आहे. त्यासाठी जंगल आणि प्राणी दोन्हींची गरज आहे. तसेच, शुटिंग लवकरच सुरू होणार असल्यामुळे सध्या राजामौली महेश बाबूसोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी एका उत्तम अभिनेत्रीच्या शोधात आहेत. राजामौलींनी एका इंडोनेशियन अभिनेत्रीला साईन केल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. पण, बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोणचीही या चित्रपटात वर्णी लागणार असल्याचं समोर आलं होतं. पण त्यानंतर या सर्व अफवा असल्याचं सांगण्यात आलं. पण, त्यानंतर पुन्हा दीपिका पादुकोण राजामौली आणि महेश बाबू यांच्या बिग बजेट चित्रपटात झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सिनेजोशच्या रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोन सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. यापैकी एक SSMB29 आहे. दरम्यान, राजामौली यांच्या चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं सशक्त महिला मुख्य भूमिकेत पाहायला मिळतात. SSMB29 मध्येही असंच काहीसं चित्र पाहायला मिळणार आहे. यासाठी दीपिका पदुकोन ही राजामौली यांची टॉप चॉईस आहे, अशी चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरू आहे. दीपिका पदुकोननं या चित्रपटाबाबत आपला निर्णय सांगण्यासाठी काही वेळ मागितल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, असं सांगितलं जात आहे की, दीपिकानं नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळे सध्या तिला आपल्या बाळासाठी वेळ द्यायचा असून तिला लगेच शूटिंग सुरू करायचं नाही.
राजामौली यांना आगामी चित्रपटात दीपिकाला कास्ट करायचं आहे. पण, त्यासाठी दीपिकाला टाईम मॅनेज करावा लागणार आहे. राजामौली जास्त वेळ थांबू शकत नाहीत, त्यामुळे दीपिकानं खूप उशीराच्या तारखा दिल्या, तर मात्र, सारंच खूप अवघड होणार आहे. कदाचित दीपिका SSMB29 चा भाग बनू शकणार नाही, असंही बोललं जात आहे.
दरम्यान, SSMB29 व्यतिरिक्त, दीपिका पदुकोण आणखी एक प्रोजेक्ट करत आहे. हॉरर कॉमेडी स्पेस प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे. ‘स्त्री 2’ चे प्रोडक्शन हाऊस असलेल्या मॅडॉक फिल्म्सचा हा प्रोजेक्ट आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीच खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा :
अकोला जिल्ह्यातील मतदान वाढवण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांना गती
पंढरपूर विधानसभेसाठी दाखल 51 उमेदवारी अर्ज; राजकीय तापमान उंचावले
आळंदी रस्त्यावरील कळस गावात दोन गटांमध्ये हाणामारी; गावात तणावाचे वातावरण