जिथे नात्यांची माती होते ते राजकारण काय कामाचे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : नात्याची घट्ट वीण, उसवून टाकते त्याला राजकारण(political) ऐसे नाव! विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्रात एकीकडे नात्यांचा उत्सव सुरू असताना दुसरीकडे नात्यांचा येळकोट चालू आहे. त्याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघाचे देता येईल. या मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होत असून या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून राहणार आहे. अजितदादा पवार विरुद्ध युगेंद्र श्रीनिवास पवार अशी लढत इथे होत आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून(political) सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध सुनेत्रा पवार यांची उमेदवारी देण्यात माझी चूक झाली. असे स्पष्टपणे सांगणाऱ्या अजितदादांनी आता आमचे घर फोडल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांच्यावर केला आहे. आमच्या आईने”दादाच्या विरोधात कुणी उभे राहू नका”असे स्पष्ट शब्दात सर्वांना सांगितले होते. मात्र माझ्याच पुतण्याला माझ्याविरुद्ध उभे करण्यात आले आहे, अशा शब्दात खंत बोलून दाखवणाऱ्या अजित दादा यांना त्यांचेच बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांनी मात्र असे काही आमच्या आईने सांगितलेले नाही. असा खुलासा करून अजित दादा पवार हे दादांत असत्य बोलत आहेत असे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे.

अजित दादा पवार यांच्याविरुद्ध त्यांच्या पुतण्याने दंड थोपटणे म्हणजे अजितदादा यांच्यासाठी तो काव्यगत न्याय असल्याचे म्हटले जाते आहे.तुम्ही तुमच्या काकाशी कसे वागला आहात? तुम्ही त्यांच्याशी कसा राजकीय व्यवहार केला आहात? याची आठवण आता त्यांचे विरोधक त्यांना करून देत आहेत. या बारामती मतदारसंघात आता येथून पुढे अजितदादा विरुद्ध युगेंद्र हा काका पुतण्या मधील राजकीय संघर्ष सुरू राहणार आहे आणि त्याचे संकेत या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळू लागले आहेत.

शरद पवार यांनी आपले राजकीय वारसदार म्हणून कन्या सुप्रिया सुळे आणि नातू रोहित पवार या दोघांची नावे पुढे केल्यानंतर अजितदादा पवार हे शरद पवार यांच्यापासून हळूहळू दूर होत गेले. अजित दादांना त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राजकीय वारसदार म्हणून पुढे आणावयाचे आहे. आणि त्यामुळेच काका पुतण्या मधील राजकीय मतभेद वाढत गेले आणि परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच स्वतःची अशी स्वतंत्र सुभेदारी निर्माण केल्यानंतरही अजितदादा पवार यांच्या मनात शरद पवार यांच्या विषयी एक हळवा कोपरा शिल्लक होता. बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर कार्यकर्त्यांच्या समोर केलेल्या भाषणात त्यांचा हा हळवा कोपरा दिसून आला. तेथे कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते फारच भावनिक झाले होते.

सुप्रिया सुळे या आपल्या बहिणी विरुद्ध आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात आणून आपण फार मोठी चूक केली असे जाहीरपणे कबूल करणाऱ्या अजितदादा पवार यांना या निवडणुकीत शरद पवार यांनी त्यांचेच घर फोडल्याचे अतिव दुःख झालेले दिसते. ते त्यांनी बोलूनही दाखवले. आता वेळ निघून गेलेली आहे.

एकूणच राजकारणात(political) स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी नात्यांची माती केली जाते हे अधोरेखित होऊन पुढे आले आहे. घरचा सातबारा वेगळा आणि राजकीय सातबारा वेगळा याची प्रचिती बारामती मतदारसंघातील काका पुतण्याच्या लढतीतून पुढे येत आहे. घरामध्ये राजकारण आणायचे नाही आणि राजकारणात घर आणायचे नाही. राजकारण वेगळे आणि कौटुंबिक नातेसंबंध वेगळे असे अनेकदा जाहीरपणे बोलून दाखवणाऱ्या शरद पवार यांनी”राजकीय गृह कलहाला”प्राधान्य दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सुमारे 40 वर्षांपूर्वी शरद पवार यांना त्यांचे बहुतांशी आमदार सोडून गेले होते. राजकारणात ते काहीसे एकाकी पडले होते. मात्र त्यांनी मोठ्या निर्धाराने स्वतःला सावरले आणि पायाला भिंगरी बांधून अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सर्वांना चकित करून टाकण्याइतके घवाघवीत यश मिळवले होते. स्वतःच्या पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी केली होती. आता चाळीस वर्षानंतर त्यांच्याच पुतणे असलेल्या अजितदादा पवार यांनी त्यांच्या पक्षाला मोठे भगदाड पाडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हायजॅक केला.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा आपणच असल्याचे सांगून त्यांनी पुन्हा पक्ष बांधणीला प्रारंभ केला आहे. त्यांना 40 वर्षांपूर्वीच्या राजकीय उलथापालथीची पुनरावृत्ती करावयाची आहे. आणि म्हणूनच कुटुंबापेक्षा पक्ष मोठा समजून ते या वयातही महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात उतरलेले आहेत.

हेही वाचा :

अजित पवारांना धक्का, तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी हाती घेतली तुतारी

‘सलमानपेक्षा लॉरेन्स परवडाला’ म्हणत अभिनेत्रीचं खळबळजनक विधान

दिग्गज क्रिकेटपटूच्या घरात झाली चोरी, चोरट्यांनी मौल्यवान दागिन्यांसह पुरस्कारही केले लंपास