कोहलीच्या वाढदिवस सिक्सर किंगची खास पोस्ट! 

भारताचा स्टार दिग्गज क्रिकेट खेळाडू विराट कोहली(Virat Kohli) आज त्याचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. त्याचे चाहते हे भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये आहेत. त्याचबरोबर त्याची गणना ही दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते. अनेक विरोधी संघाच्या गोलंदाजांचा जेव्हा विराट कोहली फलंदाजीसाठी येतो तेव्हा घाम गाळला जातो.

क्रिकेट विश्वामध्ये अशा अनेक जोड्या आहेत त्या भारतीय क्रिकेट चाहत्यांना एकत्र खेळताना पाहायला आवडतात. यामध्ये सर्वात लोकप्रिय आणि मनोरंजक जोडी म्हणजेच किंग विराट कोहली(Virat Kohli) आणि सिक्सर किंग युवराज सिंह या दोघांना एकत्र पाहायला भारतीय क्रिकेट चाहत्यांना फार आवडते. आता भारताच्या सिक्सर किंगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून किंग कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

युवराज सिंहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून विराट कोहलीला त्याच्या ३६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. युवराज सिंहने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या मजेशीर व्हिडिओमध्ये सुरुवातीला विराट कोहली आणि युवराज सिंह गमतीशीर अंदाजामध्ये फोनवर बोलताना दिसत आहेत. त्यानंतर गाणे टाकून विराट कोहलीसोबतचे फोटो युवराज सिंहने शेअर केले आहेत.

या पोस्टवर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “#KingKohli तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझे सर्वात मोठे पुनरागमन झाले आणि जग तुमच्या ठोस पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहे तुम्ही ते भूतकाळात केले आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही ते पुन्हा कराल देव आशीर्वाद देईल! खूप प्रेम”

भारतीय नियामक मंडळाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी विराट कोहलीचे फोटो लावले आहेत आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ५३८ सामने २७१३४ धावा आणि अजूनही खेळत आहेत. त्यानंतर त्यांनी खाली लिहिले आहे की, २०११ विश्वचषक, २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता, ICC पुरुष T20 विश्वचषक विजेता असे त्याच्या कामगिरीवर जोर टाकला आहे.

https://twitter.com/i/status/1853636981479071905

भारताच्या संघाने गमावलेल्या सामन्यांमध्ये बऱ्याचदा विराट कोहली टीम इंडियाला सामने जिंकवून दिले आहेत. त्याचबरोबर भारताच्या संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवला होता, विराट कोहलीची गणना ही एका यशस्वी कर्णधारमध्ये केली जाते.

हेही वाचा :

“मी निवडणूक लढवणार नाही… शरद पवारांची राजकारणातून निवृत्ती?

याला म्हणतात जबरा फॅन! 95 दिवस मन्नत बाहेर थांबला, शाहरुखने दिलं खास सरप्राईज

प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिताय? सावधान! कर्करोग, हृदयविकार अन् रक्तदाबाला आमंत्रण,