कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शासकीय, निमशासकीय तसेच सहकार, शिक्षण, वित्तीय संस्था अधिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना 58 किंवा 60 वय पूर्ण झाल्यानंतर सेवेतून निवृत्त व्हावे लागते. पण निवृत्तीची अट नसलेली आणखी कितीतरी क्षेत्र आहेत. त्यापैकीच एक म्हणजे राजकारण(political) होय. राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय सहसा कोणताही राजकारणी घेत नाही. नानाजी देशमुख यांचा मात्र अपवाद करावा लागेल. या एकूण पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकारणातून विरक्ती घेण्याचा विचार बोलून दाखवला आहे. अर्थात व्यक्त केलेला विचार आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये सध्या तरी दीड वर्षांचं अंतर आहे. कारण त्यांची राज्यसभेची मुदत दीड वर्षाने संपणार आहे.
सध्या राज्यभर विधानसभा(political) निवडणुकांची धामधूम सुरू आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात शरद पवार सध्या व्यस्त आहेत. त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. या मतदारसंघात अजितदादा विरुद्ध युगेंद्र म्हणजे काका पुचण्यात लढत होत आहे आणि शरद पवार हे त्यांच्या पुतण्याच्या विरोधात आणि युगेंद्र या नातवाच्या समर्थनार्थ ताकतीनिशी बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी उतरले आहेत. योगेंद्र श्रीनिवास पवार यांच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी “आता कुठे तरी थांबले पाहिजे”असं वक्तव्य करून राजकीय विरक्तीचे संकेत दिले आहेत.
पहिली तीस वर्षे मी बारामतीचा नेतृत्व केले. त्यानंतरची तीस वर्षे अजित पवारांनी नेतृत्व केले. आता येथून पुढचे नेतृत्व नव्या पिढीकडे दिले पाहिजे. मला तुम्ही कधीही थांबा म्हटलं नाही. सलग 14 वेळा निवडून दिलात. आता थांबलं पाहिजे. नव्यांना संधी दिली पाहिजे. असं सांगणाऱ्या शरद पवार यांना बाबामतीचे नेतृत्व युगेंद्रकडे द्या असे म्हणावयाचे आहे. अर्थात बारामती म्हटलं की तिथे पवार कुटुंबीयातील सदस्यांशिवाय पर्याय नसतो. आता अजित दादा पवार यांना पर्याय म्हणून शरद पवार यांनी युगेंद्र पवारच दिले आहेत.
अजितदादा पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र हे चिरंजीव आहेत. आणि त्यांनीच काकाला आव्हान दिले आहे. याच काकांनी त्यांच्या काकांना दोन वर्षांपूर्वी आव्हान दिले होते. आता त्यांना पुतण्याकडून काव्यगत न्याय मिळाला आहे असे म्हणता येईल. अजितदादा यांना ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध सुनेत्रा पवार यांना उभे करण्याची माझ्याकडून चूक झाली. आता माझ्याविरुद्ध माझ्याच पुतण्याला उभे करण्याची चूक करू नका असे आवाहन अजितदादांनी केले होते. पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. आता त्यांनी आमचं घर फोडलं असा आरोप शरद पवार यांच्यावर केला आहे.
सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्या हातात राजकीय(political) वारसा सूत्रे देऊन सक्रिय राजकारण सोडण्याची भाषा शरद पवार यांनी सुरू केली आहे. हा त्यांच्या निवृत्तीच्या पहिल्या घोषणेचा”रि प्ले”आहे. दोन सव्वा दोन वर्षांपूर्वी शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची भाषा करून स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता आणि अवघ्या 36 तासात तो मागेही घेतला होता. हे राजीनामा नाट्य मुद्दाम घडवून आणले होते असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटर मध्ये शरद पवार यांनी त्यांच्या”लोक माझे सांगाती”या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशन समारंभात बोलताना आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदातून मुक्त होत असल्याचे जाहीर करून खळबळ उडवून दिली होती.
प्रत्यक्षात मात्र त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला आणि तिथेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याची बीजे रोवली गेली. त्यानंतर अवघ्या एक दोन महिन्यात अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भली मोठी फूट पाडली. जवळपास 40 आमदारांना बरोबर घेऊन ते बाहेर पडले. हा तसा राजकीय भूकंप होता.
आता पुन्हा दोन सव्वा दोन वर्षानंतर शरद पवार यांनी राजकीय विरक्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. आता कुठेतरी थांबावे असे मला वाटू लागले आहे. माझी राज्यसभा सदस्यत्वाची मुदत दीड वर्षानंतर संपणार आहे. त्यानंतर मात्र मी थांबणार आहे. सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा माझा विचार असला तरी मी समाजकारणात राहणार आहे. समाजासाठी कार्यरत राहणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
आता त्यांचे विरक्तीचे विचार दीड वर्षानंतर अंमलात येतीलच असे नाही. कारण ते समाजकारण करणार आहेत आणि राजकारण(political) समाजकारणापासून फार दूर असते असे नाही. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख यांनी वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर राजकारणातून पूर्णपणे निवृत्ती घेतली आणि साठे नंतरचे आयुष्य कृषी क्षेत्रात काहीतरी नवे घडवण्यासाठी व्यतीत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. काही वर्षांपूर्वीच नानाजी देशमुख यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजकारणातून निवृत्त होणारे नानाजी देशमुख हे भारतीय राजकारणातील एकमेव नेते म्हणता येतील. आणि शरद पवार यांनी वयाची 84 वर्षे गाठल्यानंतर निवृत्तीची भाषा सुरू केली आहे.
हेही वाचा :
‘बाईईई.. आता साडी नेसल्यानेही होतो कॅन्सर?’
मुख्यमंत्र्यांची दोन तास चौकशी; अडचणींत होणार वाढ?
BSNL पडणार सर्वांवर भारी, 5G टॉवर बसवण्याचे काम सुरू, Airtel Jio’ची चिंता वाढली