इचलकरंजी, १० नोव्हेंबर २०२४ : महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथे आयोजित युवा मेळाव्यात सुरेश हाळवणकर यांनी ओजस्वी भाषण (speech)केले. त्यांच्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे कार्य, हिंदुत्व, देशप्रेम, आणि डिजिटल क्रांती यावर प्रकाश टाकला.
सुरेश हाळवणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन(speech) करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी विचारांमुळे झालेल्या डिजिटल क्रांतीची महती मांडली. “आज प्रत्येकाच्या हातात 4जी, 5जी कनेक्टिव्हिटी आहे, हे फक्त मोदींच्या प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे. सॅटॅलाइट्समुळे हवामानाचे अचूक अंदाज मिळत आहेत, आणि त्यामुळे शेतीसह विविध क्षेत्रात सुधारणा घडून आल्या आहेत,” असे ते म्हणाले.
या मेळाव्याला उपस्थित इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे, संजय पाटील, आणि अनेक मान्यवरांपैकी सुदर्शन पाटसकर, अरविंद माने, राजीव बोंद्रे, नामदेव सातपुते, आप्पा रावळ, मनोज तराळ, हेमंत वरुटे, नितीन पडियार, सचिन लायकर, सतीश घोरपडे यांचाही विशेष सहभाग होता. हाळवणकर यांनी महायुती उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या विजयासाठी तरुणाईने उत्साहाने काम करण्याचे आवाहन केले.
हाळवणकरांनी पंतप्रधान मोदींचे युवा देशाची संकल्पना आणि भारताच्या भविष्याचा विचार अधोरेखित करत युवकांना मार्गदर्शन केले. “आपले देशाचे पंतप्रधान मोदी यांनी देशाला युवा नेतृत्वाच्या दिशेने चालवण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आजचा युवक ही आपली खरी ताकद आहे,” असे ते म्हणाले.
जयेश बुगड आणि आदित्य आवाडे यांच्या मेळाव्याच्या तयारीसाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत हाळवणकरांनी विशेष अभिनंदन केले. त्यांच्या या ओजस्वी भाषणाने, उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची आणि हिंदुत्वाची भावना उफाळून आली.
हेही वाचा :
पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी! 19 आणि 20 तारखेला School Bus सेवा बंद कारण…
…तर महाराष्ट्रात लागू होणार Right To Disconnect! प्रायव्हेट सेक्टर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा दिलासा
आता नोकरीसाठी घर, गाव सोडण्याची गरज नाही! महाराष्ट्रात लवकरच ‘वर्क फ्रॉम होमटाऊन’ धोरण?