झोमॅटोचे (Zomato )सीईओ दीपिंदर गोयल यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन नव्या फिचरसंबंधी सर्व अपडेट्स शेअर केल्या आहेत. 10 नोव्हेंबर 2024 रोजी दीपिंदर गोयल यांनी ‘Food Rescue’ या आपल्या नव्या फिचरसंबंधी माहिती दिली होती. हे फिचर झोमॅटोवरील रद्द केलेल्या ऑर्डर इतर संभाव्य ग्राहकांना रिडायरेक्ट करून अन्नाची नासाडी कमी करण्याचा प्रयत्न करतं. या फिचरसंबंधी माहिती देताना गोयल यांनी लिहिलं आहे की, “रद्द केलेल्या ऑर्डर्स आता जवळपासच्या ग्राहकांसाठी पॉप अप होतील, जे त्यांना त्यांच्या मूळ पॅकेजिंगमध्ये अप्रतिम किमतीत मिळवू शकतात. काही मिनिटांत ही ऑर्डर त्यांना प्राप्त होईल”.
दीपिंदर गोयल यांनी नव्या फिचरची माहिती दिल्यानंतर अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तर काहींनी त्यांना सल्ले दिले आहेत. यामधील एका युजरने दिलेले सल्ले वाचून दीपिंदर गोयल चांगलेच प्रभावित झाले. या युजरचं नाव भानू असं आहे. या फिचरचा दुरुपयोग कसा रोखता येईल यादृष्टीने त्याने काही सल्ले दिले आहेत.
1) कॅश ऑन डिलिव्हरीसाठी हे लागू असू नये.
2) डिलिव्हरी पॉईंटपासून 500 मीटरपर्यंत पोहोचल्यास ती रद्द करण्याची परवानगी दिली जाऊ नये
3) 2 मुर्खांनी एकत्र जेवणाची ऑर्डर देणे आणि रद्द केल्याने सवलत मिळण्याची शक्यता
4) एका महिन्यात जास्तीत जास्त दोन ऑर्डर रद्द करण्याची परवानगी हवी
तरुणाने दिलेले सल्ले वाचून दीपिंदर गोयल प्रभावित झाला असून थेट नोकरीची ऑफर दिली आहे. आपण एकत्र काम करुया असं त्यांनी म्हटलं आहे. “यापैकी अनेक गोष्टी आधीच अंमलात आणल्या आहेत. पण तुझे विचार चांगले आहेत. तू कोण आहेस आणि काय करतोस? आपण एकत्र काम करु शकतो का? जर तुला जास्त बोलायचं असेल तर मला डीएम कर,” असं दीपिंदर गोयल म्हणाले आहेत.
दीपिंदर गोयल यांच्या करण्याच्या ऑफरला प्रतिसाद देताना, युजरने उत्तर दिलं की, “खूप धन्यवाद. मी बंगलोरचा आहे आणि नियमितपणे Blinkit वापरतो. मी नियमितपणे तुमच्या कंपनीला टॅग करून ट्विटरद्वारे सेवा सुधारण्यासाठी सूचना देतो. नकारात्मक प्रभाव कमी करण्याचा नेहमी विचार करतो. आणि स्टार्टअप कंपनीमध्ये पीएम म्हणून काम करत आहे”झोमॅटोचे(Zomato ) सीईओ दीपंदर गोयल यांनी नुकतंच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी आपले अनेक अनुभव शेअर केले. त्यांची पत्नी ग्रीसिया मुनोझसह डिलिव्हरी करण्याचा अनुभवही त्यांनी शेअर केला आहे.
हेही वाचा :
मी एकटा मुख्यमंत्री ज्याचं मुंबईत घर नाही…फडणवीसांचं भावनिक आवाहन
अमित शाहांवर टीका करताना राऊतांकडून व्यापा-यांचा अपमान? MACCIA अध्यक्ष म्हणाले ‘आमच्या नादाला…’
रितेश देशमुखचा BJP वर निशाणा! म्हणाला, ‘मविआचं सरकार येणार