सेलिब्रिटी मायलेकीतील वाद न्यायालयात; रुपाली गांगुलीनं सावत्र मुलीवर ठोकला 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

छोट्या पडद्यावरील ‘अनुपमा’ या मालिकेतील अभिनेत्री (Actress)रुपाली गांगुली ही सतत चर्चेत असते. रुपाली गांगुलीची सावत्र लेक ईशा वर्मानं तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले. ईशा गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर रुपाली आणि तिचा नवरा अश्विन वर्मावर गंभीर आरोप केले. या सगळ्यावर पहिल्यांदाच रुपाली गांगुलीनं प्रतिक्रिया दिली आहे. अर्थात तिनं थेट 50 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. ईशानं त्यानंतर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.

आता ईशानं तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट हे पब्लिकवरून प्रायव्हेट केलं आहे. रुपाली गांगुलीची (Actress)सावत्र लेक ईशा वर्माचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर 15.8K फॉलोअर्स होते. इतकंच नाही तर तिचं हे अकाऊंट व्हेरिफाईड होतं. ईशानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात ती रडताना दिसली. त्यानं आरोप केला की रुपाली गांगुली आजुबाजूला असली की तिला सुरक्षित वाटत नाही.

हिंदुस्तान टाइम्सनुसार, रुपालीनं सोमवारी सना रईस खानच्या मदतीनं ईशावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला आहे. यावेळी 50 कोटींची नुकसान भरपाई करण्याची मागणी तिनं केली आहे. ज्यात असं म्हटलं आहे की ईशानं सार्वजनिकपणे जे दावे केले आहेत त्यामुळे रुपालीच्या व्यक्तिमत्त्वावर आणि तिच्या प्रोफेश्नल प्रतिष्ठा मलीन झाली आहे. ईशानं एका व्हिडीओत रुपालीचा मुलगा रुद्रांशचा देखील उल्लेख केला आहे आणि त्याची माफी मागितली होती. त्यामुळे रुपालीनं तिच्यावर रुपालीनं कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले.

दरम्यान, सना ही सेलिब्रिटी वकील आहे. सनानं यावेळी म्हटलं की ‘आम्ही रुपालीच्या सावत्र मुलीवर तिच्या खोट्या वक्तव्यांवरून अब्रु नुकसानिचा दावा ठोकला आहे. कारण खोटे आरोप करत प्रसिद्धी मिळवण्याच्या सगळ्या प्रकरणाच्या रुपाली गांगुली ही विरोधात आहे. ईशानं केलेले सगळे आरोप हे खोटे आहेत आणि त्यामुळे रुपालीच्या प्रतिष्ठेवर त्याला परिणाम झाला आहे. त्यामुळे तिच्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी तिनं हा दावा ठोकला आहे.’

ईशानं रुपाली आणि तिचा नवरा अश्विनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. रुपालीचं अश्विनसोबत विवाहबाह्य संबंध होते आणि तिनं ईशाच्या आई-वडिलांचा संसार मोडला आहे. रुपाली सतत अपमान करायची आणि तिनं ईशा आणि तिच्या आईला जिवेमारण्याची धमकी दिल्याचे देखील सांगितले.

हेही वाचा :

आकाश पाळण्यात बसली अन् डोक्याची कवटीच उडाली! केस अडकले, हळूहळू…; अंगाचा थरकाप उडवणारी घटना

बिग बॉस फेम अभिनेता आदिश वैद्य आणि गायिका जाई देशमुखचं ‘कशी ओढ’ गाण प्रदर्शित!

बाळासाहेबांवरुन राज ठाकरेंनी डिवचलं! राऊतांकडून मोजून 9 शब्दात उत्तर; म्हणाले, ‘राज ठाकरे काय…’