मुकेश खन्ना हे त्यांच्या आयकॉनिक अशा शक्तिमान(Shaktiman) या भूमिकेसाठी ओळखले जातात. ते स्वत: आणि त्यांचे चाहते देखील या भूमिकेला आजही आठवतात. आता मुकेश खन्ना पुन्हा एकदा शक्मिमान या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, या चित्रपटातील एक व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांचे चाहतेच त्यांना ट्रोल करत आहेत.
खरंतर मुकेश खन्ना ही इंडियन सुपरहीरो म्हणून घरा-घरात पोहोचले. या मालिकेवर जेव्हा चित्रपट येणार असं म्हटलं जातं होते तेव्हा त्यात रणवीर सिंग हा शक्तिमानच्या(Shaktiman) भूमिकेत दिसतील असं म्हटलं. मुकेश खन्ना यांना शक्तिमानच्या भूमिकेत रणवीर सिंग नको होता. त्यांचं म्हणणं होतं की शक्मितानची भूमिका अशा अभिनेत्यानं साकारायला हवी जो त्या भूमिकेला न्याय देईल. मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंगला या भूमिकेसाठी नकार देण्याचं कारण त्याचं न्यूड फोटोशूट होतं. दरम्यान, आता स्वत: मुकेश खन्ना यांनी घोषणा केली की ते ‘शक्तिमान’ या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
मुकेश खन्ना यांनी शेअर केलेल्या काही पोस्ट आणि व्हिडीओमध्ये ते शक्तिमानच्या भूमिकेत दिसून येत आहेत. दरम्यान, 90 च्या दशकात ज्या मुलांनी ‘शक्तिमान’ ही मालिका पाहिली आहे. ते हे सगळं पाहून आनंदी नाहीत. त्यांनी यावरून मुकेश खन्ना यांना ट्रोल केलं असून काही सल्ले दिले आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘थोडा विचार करा जर त्याच्यात आणि खलनायकात फाईट सीन झाला तर शक्तिमान हा मॅक्स रुग्णालयात दिसेल.
‘ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘शक्तिमानला खराब करु नका.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘अरे हा अजून भूतकाळात अडकला आहे. कोणीतरी त्याला यातून बाहेर काढा.’ आणखी एक नेटकरी म्हणाला की ‘शक्तिमानची खिल्ली उडवत आहात. आता दुसऱ्या कोणाला येण्याची संधी द्या.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आता या सगळ्यातून पुढे जाण्याची वेळ आली आहे. तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारू शकत होता किंवा अशी भूमिका जी वेळो-वेळी शक्तिमानला सल्ला देत आहे.’ अशा विविध कमेंट करत नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांची त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :
रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला लाथ मारली; ‘तो’च म्हणतो ‘साहेब मस्करी करत होते!’
प्रचार रॅलीत चिडलेल्या महिलेवर सदा सरवणकरांंच्या मुलाचे गंभीर आरोप
पक्ष फोडणाऱ्यांना आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला