सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना महिन्याला 3 हजार रुपये देणार, नाना पटोलेंची घोषणा

राज्यात विधानसभा(assembly) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी मोठ-मोठ्या घोषणा केल्या आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. अशातच नाना पटोले यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना 1500 हजार रुपयांऐवजी 3000 हजार रुपये देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

लाडक्या बहिणींना महाविकास आघाडीचे सरकार (assembly)आल्यावर प्रत्येक महिन्याला 3 हजार देणार असल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. यावेळी नाना पटोले यांनी भाजपवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरु केली त्यावेळी मी त्या योजनेचं स्वागत केलं. त्यासोबतच मी त्यांना या योजनेचे पैसे देखील वाढवले पाहिजेत असं देखील सांगितले होते.

गरिबांचे हे पैसे आहेत ते त्यांना मिळालेच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. याचा सरकारच्या तिजोरीवर काही ताण नाही पडत. काही लोकांचे कर्ज माफे केली जाते ते आम्ही थांबवू आणि ते गरिबांना देऊ. कर्ज घेऊन दिवाळी साजरी करावी लागत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीसोबतच जे तरुण शिकले आहेत त्यांना आम्ही 4 हजार रुपये देणार आहोत.तसेच विदर्भात महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट 90 टक्के असणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

बंडखोरांचा प्रचार करणाऱ्यांवर कारवाई करू असं सूचक विधान नाना पटोलेंनी केलं आहे. एखाद्या विभागामध्ये अशी घटना घडू शकतो पण संपूर्ण विदर्भामध्ये असं होऊ शकत नाही. नागपुरात काँग्रेसचे काही नेते बंडखोरांचा प्रचार करताहेत त्यावरून नाना पटोलेंनी त्यांना हा इशारा दिलाय.

हेही वाचा :

नितीन गडकरींवर विरोधक टीका का करत नाहीत? स्वतःच दिलं उत्तर

विद्यार्थ्यांनी बालदिनी शाळेत करा ‘हे’ भाषण, टाळ्यांचा कडकडाट थांबणार नाही!

आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच चाकूने वार केल्यानंतर ‘तो’ हॉस्पिटलच्या लॉबीमधून