अभिनय क्षेत्र म्हटलं की नेहमीच रिलेशनशिप आणि (married)विवाहबाह्य संबंध ऐकायला मिळतात. त्यात कलाकार, दिग्दर्शक ते निर्माते सगळ्यांची नावं कोणाशी ना कोणाशी जोडण्यात येतात. असंच काहीसं दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासोबत झालं आहे. नयनताराचं नाव देखील एका विवाहीत दिग्दर्शकासोबत जोडण्यात आलं होतं. त्यामुळे त्या दिग्दर्शकाच्या पत्नीनं थेट सगळ्यांसमोर नयनताराला धमकी दिली होती.
नयनतारानं नुकतीच धनुषसाठी एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे. तिनं शेअर केलेल्या पोस्टमुळे हा वाद आता मोठा झाला आहे. नयनतारा वादाच्या भोवऱ्यात अडकली या आधी देखील ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी एका(married) रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. तिचं नाव दाक्षिणात्य दिग्दर्शक आणि कोरियोग्राफरसोबत जोडण्यात आलं होतं. त्या दोघांचं हे रिलेशनशिप हॉट टॉपिक ठरली होती.
नयनतारासोबत अफेअरमुळे त्या दिग्दर्शकाच्या पत्नीनं घटस्फोट घेतला. आता हा कोणता दिग्दर्शक असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तो दुसरा कोणी नसून प्रभुदेव आहे. प्रभुदेवा आणि नयनतारानं 2009 मध्ये ‘विल्लु’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. नयनतारा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. प्रभुदेवानं त्याचं दिग्दर्शन केलं होतं. तर या चित्रपटा दरम्यान, त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती.
चित्रपटादरम्यान, जेव्हा त्या दोघांच्या नात्याची चर्चा इतकी रंगली होती की काही चाहत्यांना तर पब्लिसिटी स्टंट वाटला होता. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका जुन्या रिपोर्टनुसार, प्रभुदेवा हा विवाहीत असूनही आणि 3 मुलं असतानाही नयनतारासोबत रिलेशनशिपमध्ये होता. नयनतारासोबतच्या रिलेशनशिपला स्वीकारत पत्नी रामलताला घटस्फोट दिला. घटस्फोट घेण्याआधी प्रभूदेवा हा नयतारासोबत रिलेशनशिपमध्ये राहत होता. मात्र, घटस्फोटानंतरही प्रभूदेवा आणि नयनतारा यांचं नातं काही जास्त काळ टिकलं नाही.
प्रभूदेवानं धोका दिल्यानंतर रामलता यांचा स्वत: वरचा ताबा सुटला होता आणि त्यांनी घटस्फोट देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला आणि मुलांची कस्टडी ही आईला मिळाली. प्रभुदेवानं 1995 मध्ये रामलताशी लग्न केलं होतं आणि 3 मुलं होते पण 2008 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचं कॅन्सरनं निधन झालं. तर प्रभूदेवाच्या पत्नीनं नयनतारावर संताप व्यक्त करत म्हटलं की जर ती समोर आली तर तिला पायानं तुडवेनं.
हेही वाचा :
“तरुणींची जबरदस्त कुटाकुटी, काका थक्क; Video viral
बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल
तुमचा पार्टनर गरजेपेक्षा जास्त पझेसिव आहे? या पद्धतीने करा डील