दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा ही तिच्या आयुष्यावर आधारित ‘नयनतारा : बियॉण्ड द फेअरीटेल’ नावच्या डॉक्युमेंट्रीच्या(documentary) प्रदर्शनासाठी तयार असतानाच तिला मोठा धक्का बसला आहे. अभिनेता तसेच निर्माता असलेल्या धानुषने नयनताराच्या या डॉक्युमेंट्रीमध्ये वापरलेल्या 3 सेकंदांच्या एका व्हिडीओ क्लिपवरुन आक्षेप घेतला आहे. धानुषने नयनताराला या 3 सेकंदांच्या व्हिडीओवरुन नयनताराला थेट 10 कोटींची नोटीस पाठवली आहे.
2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘नानूम रावडी धान’ नावाच्या चित्रपटाच्या सेटवरील 3 सेकंदांची क्लिप वापरण्यासाठी आपली संमती नसल्याचं धानुषने म्हटलं असून त्यासंदर्भात नोटीस पाठवल्याचं नयनतारानेच आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पत्रात म्हटलं आहे. नेटफ्लिक्सच्या डॉक्युमेंट्रीच्या(documentary) ट्रेलरमध्ये धानुषच्या चित्रपटाच्या सेटवरील ही 3 सेकंदांची क्लिप वापरल्याच्या मोबदल्यात 10 कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी अशी धानुषची मागणी असल्याचं नयनताराने म्हटलं आहे.
आता या प्रकरणानंतर नयनताराचा पती विग्नेश शिवननेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. विग्नेश हा ‘नानूम रावडी धान’ चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. त्याने आपल्या पत्नीची पाठराखण करत वादात असलेली ती 3 सेकंदांची क्लिप आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून शेअर केली आहे. विशेष म्हणजे ही 3 सेकंदांची क्लिप सेटवरील बिहाइण्ट द सीनमधील तुकडा आहे. विग्नेशने ही वादात असलेली क्लिप शेअर करत धानुषच्या कायदेशीर नोटीशीची खिल्ली उडवली आहे.
विग्नेशने इन्स्टाग्रामवर बिहाइण्ड द सीन व्हिडीओ शेअर करताना ‘नानूम रावडी धान’च्या सेटवरचा व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ शेअर करताना विग्नेशने, “हीच ती 10 कोटींची क्लिप आहे जी नेटफ्लिक्सच्या आमच्या डॉक्युमेंट्रीमधून काढून घेण्यास सांगण्यात आलं आहे. ती क्लिप तुम्ही येथे मोफत पाहू शकता,” अशी कॅप्शन लिहिली आहे. विग्नेशनने धानुषच्या टीमने पाठवलेल्या 10 कोटींच्या नोटीसचा फोटोही शेअर केला आहे. या नोटीसमधील 10 कोटींची मागणी केलेला भाग विग्नेशने हायलाइट केला आहे.
विग्नेश आणि नयनतारा ‘नानूम रावडी धान’ चित्रपटाच्या सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडले होते. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन विग्नेशनेच केलं होतं. चित्रपटाची निर्मिती धानुषच्या वंडरबार कंपनीने केली होती. “आम्हाला तू पाठवलेल्या नोटीसमध्ये जेव्हा त्या व्हिडीओच्या वापराबद्दल प्रश्न उपस्थित केल्याचं पाहून धक्काच बसला. हे व्हिडीओ आमच्या खासगी डिव्हाइसवर आम्ही शूट केलेले आहेत.
तसेच हे व्हिडीओ बिहाइण्ड द सीनमध्ये सार्वजनिकरित्या सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. या 3 सेकंदांच्या व्हिडीओसाठी 10 कोटींची मागणी करण्यात आली आहे. तुझं हे वागणं हीन दर्जाचं आहे. तसेच यामधून तू कसा आहेस याची झलक पाहायला मिळते,” असं नयनताराने धानुषला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. हा वादात असलेला व्हिडीओ खाली पाहा…
‘नयनतारा : बियॉण्ड द फेअरीटेल’ या डॉक्युमेंट्रीमध्ये नयनताराच्या आयुष्यातील अनेक खासगी गोष्टींवर पहिल्यांदाच प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये नयनताराचे कुटुंबीय, मित्रमैत्रिणींचा समावेश आहे. ही डॉक्युमेंट्री आज म्हणजेच 18 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.
हेही वाचा :
लग्नसराई सुरु होताच सोन्याचे भाव घसरले!
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री..; ‘या’ नेत्याचा मोठा दावा
मतदानाच्या दोन दिवसआधी भाजपचा मोठा डाव, ठाकरे गटाला धक्का