दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी…. Video

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू एश्टन एगरने (cricket)क्रिकेटच्या मैदानावर असं काही केलं, जे करायला वाघाचं काळीज लागतं. एश्टन एगर सध्या शेफील्ड शिल्ड स्पर्धेच वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाकडून खेळतोय.

व्हिक्टोरीया संघाविरुद्ध झालेल्या (cricket)सामन्यात, खांद्याला दुखापत झाली असतानाही त्याने हिम्मत दाखवली आणि अडचणीत असलेल्या संघासाठी तो फलंदाजीला उतरला.

खांद्याला दुखापत झाल्यामुळे त्याला असाह्य वेदना होत होत्या. मात्र त्याने दुर्लक्ष केलं आणि फलंदाजी करणं सुरु ठेवलं. जोएल कर्टीससोबत मिळून त्याने १५ धावांची भागीदारी केली. कर्टीसने फलंदाजी करताना २३९ चेंडूचा सामना करत ११९ धावांची शानदार खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने १६ चौकार खेचले. या खेळीच्या बळावर त्याने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या ३२५ धावांपर्यंत पोहोचवली. शेवटी फलंदाजीला आलेल्या एश्टन एगरला एकही धाव करता आली नाही. मात्र संघ अडचणीत असताना त्याने एक बाजू धरुन ठेवली होती.

येत्या २२ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. मात्र या मालिकेसाठी एश्टन एगरला ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आलेलं नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्पेशलिस्ट फिरकी गोलंदाज म्हणून अनुभवी नॅथन लायनला स्थान देण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने तस्मानियाला पराभूत केलं होतं. या सामन्यात त्याने फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी केली होती. याससह गोलंदाजीतही बहुमूल्य योगदान दिलं होतं. तो टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून शेवटचा टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याला ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आलेलं नाही.

बॉर्डर- गावसकर मालिकेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ:

पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), जोश हेजलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिच मार्श, नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.

हेही वाचा :

आज प्रचार संपणार आणि उमेदवारांचं टेन्शन वाढणार!

उद्धव ठाकरेंनी भरसभेत केली अमित शाह यांची मिमिक्री; डोक्यावर तेल लावा म्हणजे…, Video

शरद पवार यांचा मोठ्या नेत्याला इशारा; म्हणाले, माझ्यासोबत या, नाहीतर…