विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे(political) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये विरोधी पक्ष बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला असून या घटनेमुळे राज्यात खळबळ माजली आहे. दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. केवळ विनोद तावडेच नाही तर एकनाथ शिंदे यांचा माणूसही पोलीस बंदोबस्तात पैसे वाटत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाने(political) कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी नालासोपारा विरारमध्ये जे घडलं आहे ते कॅमेरासमोर घडलं आहे. खुलासे कसले करता. भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. भाजपचा या निवडणुकीतला खेळ संपला आहे. भाजप पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवाकडे पाच कोटी रुपये पकडण्यात आले. हॉटेलमध्ये हे सुरू होतं.बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना अडवून ठेवलं. त्यांच्या अंगावर पैसे फेकले. त्यांना हॉटेलमध्ये कोंडून ठेवलं. याच्यावर भाजप आता काय खुलासा करणार, असा सवालही त्यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघात १५-२० कोटी रुपये आचारसंहिता लागू होण्याआधी पोहोचले. नाशिकमध्येही भाजप आणि एकनाथ शिदें गटाच्या माणसांकडूनही पैसे आता जप्त करण्यात आले आहेत. ठाण्यातून पैसे वाटपासाठी खास माणसांच्या नेमणुका केल्या आहेत. ठाण्याच्या बाजूला इशान्य मुंबई आहे. तिथे राम नेफाळे नावाचा एक माणूस आहे. शिंदेंचा हा माणूस आहे. राम नेफाळे हा माणूस रात्री ११ नंतर पैसे घेऊन जातो आणि् त्या भागातल्या मतदारसंघात पैसे वाटप करून पोलीस बंदोबस्तात परत ठाण्यात जातो असा, गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
23 तारखेनंतर या राम नेफाळेचं काय करायचं हे मी ठरवणार आहे. राम नेफाळेंसारख्या पैसे वाटप करणाऱ्या १८ लोकांची माझ्याकडे नावं आहेत. तर विनोद तावडे स्वत: पैसे वाटतायेत हे आश्चर्य. आमच्या बॅगा तपासतात, खिसे तपासतात. हेलिकॉप्टर विमानं तपासतात, घरात येतात, वाहने तपासतात. निवडणूक आयोगाने जो आमच्या मागे ससेमीरा लावला आहे. तो या भाजप आणि शिंदे गटाच्या माणसांच्या मागे लावला असता तर किमान महाराष्ट्राच्या तिजोरीत १००० कोटी रुपये जमा झाले असते.
विनोद तावडे यांच्याकडे १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती, असं मी ऐकडल आहे. त्यातील फक्त ५ कोटी रुपये सापडले. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी समाज हिताचं काम केलं आहे, ते पण निवडणुकीत. सध्याची विधानसभा निवडणूक कोणत्या पद्धतीने लढवली जात आहे, हे यावरून स्पष्ट होतं आहे. यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सायंकाळी ५ वाजता माध्यमाशी संवाद साधणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :
नयनतारानं Ex बॉयफ्रेंडमुळे सोडलेली चित्रपटसृष्टी
विनोद तावडेंनी 5 कोटी वाटले, माझ्याकडे डायरी..; बविआ-भाजपमध्ये मोठा राडा
लग्नसराईच्या दिवसांत सलग दुसऱ्या दिवशी सोनं वधारलं; जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव