महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी(politics) 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. तर उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दुसरीकडे विरारमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून राज्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
सध्या या घटनेचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तर या संपूर्ण घटनेवर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(politics) यांनी प्रतिक्रिया देत माझी बॅग आजही तपासली गेली. विनोद तावडे यांची बॅग कोण तपासणार..? असा सवाल ठाकरेंनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझी बॅग आजही तपासली गेली पण विनोद तावडे यांची बॅग कोण तपासणार? काल नागपूरमध्ये माजी गृहमंत्री यांच्यावर दगड हल्ला झाला. दगड तपासण्याचं काम कोण करणार? असा सवाल देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
विरारमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडी कार्यकर्त्यांनी केला आहे. सध्या या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेवरून सध्या विरार पूर्व येथील विवांत हॉटेलमध्ये भाजपाचे नेते विनोद तावडे आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे.
विनोद तावडे यांनी मतदारांना वाटण्यासाठी 15 कोटी आणल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. मला जाऊ द्या,मला माफ करा अशी विनंती करणारे 25 फोन आपल्यला केल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी सर्व आरोप फेटाळे आहे.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंचा हा माणूस पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो; संजय राऊत
विनोद तावडेंनी 5 कोटी वाटले, माझ्याकडे डायरी..; बविआ-भाजपमध्ये मोठा राडा
टिकटॉक स्टार इम्शा रहमानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक