“14 वर्षांनंतर मेस्सीची भारतात धमाकेदार एंट्री!”

स्टार फुटबॉलपटू(footballer)लिओनेल मेस्सीचे जगभरात चाहते आहेत. त्याच्या भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हा फुटबॉलचा स्टार त्याचा राष्ट्रीय संघ अर्जेंटिना भारतात येऊन आंतरराष्ट्रीय सामने खेळताना दिसणार आहे. केरळ सरकारने हा आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करण्याची योजना तयार केली आहे. माहितीनुसार अर्जेंटिनाच्या संघ व्यवस्थापनानेही ही योजना स्वीकारली आहे. केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुरहिमन यांनी याबद्दल बुधवारी ही घोषणा केली. मात्र अर्जेंटिनाचा हा सामना कोणत्या संघाविरुद्ध होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिनाचा राष्ट्रीय फुटबॉल (footballer)संघ पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी राज्याला भेट देणार असल्याची माहिती सध्या केरळ सरकारकडून देण्यात आली आहे. येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुरहिमन म्हणाले की, हा सामना राज्य सरकारच्या संपूर्ण देखरेखीखाली आयोजित केला जाईल.

या हाय-प्रोफाइल फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व आर्थिक मदत राज्यातील व्यावसायिकांकडून केली जाईल. याबद्दल ते म्हणाले की, ‘पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीसह अर्जेंटिनाचा फुटबॉल संघ राज्याला भेट देणार आहे.’ अर्जेंटिना संघ व्यवस्थापन याबाबत अधिकृत घोषणा करणार आहे. दीड महिन्यात फुटबॉल संघाचे लोक केरळमध्ये येतील, असेही केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुरहिमन म्हणाले. “आम्ही अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघ व्यवस्थापनासोबत या संदर्भात संयुक्त घोषणा करण्याचा निर्णय घेतला आहे.”

किमान 50,000 लोक बसण्याची क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये हा सामना होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सामन्याचे ठिकाण कोची असू शकते, असेही संकेत त्यांनी दिले. क्रीडामंत्र्यांनी सांगितले की, अर्जेंटिना फुटबॉल संघाचे चाहते भारतात सर्वाधिक आहेत आणि एक चतुर्थांश चाहते केरळमध्ये आहेत. यामुळेच अर्जेंटिनाचा संघ केरळमध्ये येण्यामागचे कारण आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन केरळच्या क्षमतेवर त्यांनी विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा :

आठवडाभरात महाराष्ट्रात कडाक्याची थंडी

“निवडणुकीच्या निकालापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचा महाराष्ट्र सरकारला झटका”

शुक्र-शनीची होणार युतीया’ 4 राशींचं उजळणार भाग्य,