सर्दी-खोकल्यापासून आराम हवाय? बनवा अद्रकाचा शिरा

हिवाळा येताच वेगवेगळे आजार सुरु होतात. या दरम्यान आपली प्रतिकारशक्तीही (immunity)कमी होती. यामुळेच हिवाळ्याच्या सिजनमध्ये गरम अन्न पदार्थ खाणे चांगले असते. आज आम्ही तुम्हाला एका अशा मसाल्याबद्दल सांगणार आहोत, जो चवीला उत्तम आहेच पण हिवाळ्यात तुमच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेतो.

हा मसाला आहे अद्रक, होय अद्रकामधे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे तुमची प्रतिकारशक्ती(immunity) वाढवतात, सर्दी-खोकल्यापासून आराम देतात आणि पचनक्रिया व्यवस्थित ठेवतात. यामुळेच आम्ही घेऊन आलोय अद्रकाच्या शिऱ्याची रेसिपी.

लागणारे साहित्य
500 ग्रॅम आले
1 कप दूध
1 कप साखर
1/2 कप देशी तूप
1/4 कप काजू
1/4 कप बदाम
1/4 कप मनुका
1 चिमूट वेलची पावडर
1 चिमूट केशर

सगळ्यात आधी आले सोलून, धुवा आणि त्याचे जाड तुकडे करा.
आता कढईत देशी तूप गरम करून त्यात तुकडे केले आले घाला आणि छान सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
आता भाजलेल्या आल्यामध्ये दूध घालून मध्यम आचेवर शिजवा. लक्षात घ्या हे मिश्रण अधूनमधून ढवळत राहा म्हणजे दूध तळाला चिकटणार नाही.
नंतर दूध अर्ध्यावर आल्यावर साखर घालून मिक्स करा.

आता हे मिश्रण दूध पूर्णपणे कोरडे होईपर्यंत आणि आले मऊ होईपर्यंत शिजवा.
आता त्यात काजू, बदाम आणि बेदाणे घालून चांगले मिक्स करा.
शेवटी वेलची पावडर आणि केशर घालून मिक्स करा.
एका प्लेटमध्ये हलवा काढून गरमागरम सर्व्ह करा.

हेही वाचा :

याहून जास्त क्रूर काय! नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकलं?

राज ठाकरेंच्या पदरी निराशाच?मनसे’ला किती जागा मिळणार पाहिलं

उद्धव ठाकरे आणि शिंदेंची छुपी युती होती का? मनसेचा सवाल