सध्या बॉलिवूड गाजवणारा अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या चित्रपटामुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या त्याचा ‘सिंघम अगेन’ (entertenment news)बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘सिंघम अगेन’मध्ये अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
अलिकडेच अर्जुनने आपला ब्रेकअप झाला असून आता मी सिंगल असल्याचा खुलासा केला आहे. अशात मलायका अरोरासोबतच्या ब्रेअकपनंतर चर्चेत असलेला अर्जुन कपूर नुकताच एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने आपल्या इंस्टाग्रामवर(entertenment news) एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. अर्जुनने आपल्या खांद्यावर एक खास टॅटू काढला आहे.
अर्जुन कपूरने काढलेला हा खास टॅटू त्याच्या आयुष्यातील खूप स्पेशल व्यक्तीसाठी आहे. अर्जुनने हा टॅटू त्याची दिवंगत आई मोना शौरी कपूर यांच्या स्मरणार्थ काढला आहे. टॅटूमध्ये त्याने ‘रब राखा’ असे लिहिलं आहे. इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करून त्याने आपल्या आईसाठी खूप भावनिक पोस्ट लिहिली आहे.
“रब राखा – देव तुमच्या पाठीशी आहे. माझी आई नेहमी हे वाक्य चांगल्या आणि वाईट काळात म्हणायची. आजही असं वाटतं की ती माझ्यासोबतच आहे, मला मार्गदर्शन करत आहे, माझ्यावर लक्ष ठेवत आहे. ‘सिंघम अगेन’ रिलीज होण्याच्या आधी मला हा टॅटू मिळाला आणि आता मी आयुष्याच्या नव्या टप्प्यावर उभा असताना मला असे वाटते की, तिने माझी पाठ थोपटली आहे आणि युनिव्हर्सची एक माझ्यासाठी काही खास योजना आहे. आई याची मला पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल आणि विश्वास दिल्याबद्दल खूप धन्यवाद. रब राखा, नेहमी…” अर्जुनच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
हेही वाचा :
दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये बदल? पालक विद्यार्थी संभ्रमात, बोर्डानं केला खुलासा
IND vs AUS ‘या’ दोन खेळाडूंनी केले पहिल्या कसोटीत भारताकडून पदार्पण…
4 दिवसात 34984 कोटी रुपये गमावले! भारतातील सर्वात मोठ्या बँकेला आर्थिक फटका