1995 ची पुनरावृत्ती ‘हे’ 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?

महाराष्ट्रात ‘अब की बार किसकी सरकार?’ या प्रश्नाचं उत्तर पुढील 24 तासांच्या आत मिळणार आहे. अनेक एक्झिट पोलनुसार महायुतीच्या बाजूने महाराष्ट्राच्या जनतेचा कौल असेल असा अंदाज आहे. मात्र महायुती किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असंही आकड्यांमधून दिसत असल्याने महाराष्ट्रामध्ये 1995 ची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात 1995 ची म्हणजेच पहिल्यांदा युती सरकार(politics) सत्तेत आल्याच्या आकडेमोडीची पुनरावृत्ती होणार म्हणजे नेमकं काय होणार आहे तर अपक्षांच्या जोरावर सत्ता स्थापन करावी लागणार आहे. म्हणूनच यंदा महाविकास आघाडी किंवा महायुतीचं सरकार सत्तेत बसणार नसून अपक्षांचे सरकार सत्तेत बसेल अशी दाट शक्यता आहे. पण हे अपक्ष कोण आणि 1996 ला अशाचप्रकारे सरकार कसं आलं होतं? हे पाहूयात…

सध्याच्या एक्झिट पोलनुसार 2024 च्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महाविकास (politics)आघाडी किंवा महायुतीमधील घटक पक्षांना स्वत:च्या जोरावर एकहाती सत्ता स्थापन करता येणार नाही असं दिसत आहे. तर 20 ते 25 अपक्ष अथवा महायुती किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्ष नसलेल्या पक्षांचे आमदार निवडून येतील असं सांगितलं जात आहे. म्हणूनच सत्तास्थापनेसाठी महायुती किंवा महाविकास आघाडीलाही अपक्षांसोबतच लहान पक्षांच्या आमदारांची मदत घ्यावी लागणार आहे. यासाठी निकालाआधीच जुळावजुळव सुरु झाली आहे. मनसे, शेकाप, वंचित, बविआ आणि प्रहारसोबतच अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांसाठी दोन्ही बाजुंनी आतापासूनच बोलणी सुरु झाली आहे. मात्र अशापद्धतीने जिंकून येणारे संभाव्य 10 अपक्ष आमदार कोणते आणि त्यांचे मतदारसंघ कोणते हे पाहूयात मात्र त्याआधी 1996 ला अशी परिस्थिती आलेली तेव्हा काय घडलं होतं आणि बाळासाहेबांनी कोणाला मुख्यमंत्रिपदावर बसवलं होतं ते पाहूयात…

1995 ची पुनरावृत्ती ‘हे’ 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?

1992 मध्ये अयोध्येत बाबरी पडल्यानंतर 1993 साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. या साऱ्याला तोंड देत असतानाच 1994 साली महाराष्ट्रातील किल्लारीला मोठा भूकंप झाला. त्यानंतर एका वर्षातच 1995 साली विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती थेट लढत झालेली. या प्रमुख पक्षांसहीत एकूण 36 पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. 1995 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 3196 अपक्ष उमेदवारांनी आपलं नशीब आमजावलं होतं. काँग्रेसने या निवडणुकीत 288 पैकी 286 जागा लढवल्या तर युतीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या शिवसेनेनं 169 जागा लढवलेल्या. त्यावेळेस शिवसेना मोठा भाऊ असल्याने भाजपाने 116 जागा लढवल्या होत्या. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला होता.

काँग्रेसला आधीच्या म्हणजेच 1990 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 61 जागांचा फटका बसला. काँग्रेसला या निवडणुकीमध्ये केवळ 80 जागा जिंकल्या. शिवसेनेनं 73 जागांवर बाजी मारली आणि त्यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपाने 65 जागांवर झेंडा फडकवला. या निवडणुकीत शिवसेनेला मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 21 जागांचा फायदा झाला. तर जागांमध्ये सर्वाधिक वाढ झालेला पक्ष ठरला भाजपा! भाजपाच्या एकूण 23 जागा वाढल्या. म्हणजेच 1990 ला 42 जागा जिंकणारा भाजपा 1995 ला सर्वात यशस्वी पक्ष ठरला. 3196 अपक्षांपैकी 45 अपक्ष आमदार निवडूण आले. शिवसेना-भाजपाची युती असल्याने काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असूनही युतीने पक्ष स्थापनेचा दावा केला. युतीला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी सहाच जागांची आवश्यकता होती कारण त्यांच्याकडे एकूण 138 जागा होत्या. अपक्षांच्या जोरावर युतीने 144 चा बहुमताचा आकडा गाठला. अपक्षांच्या मदतीने सत्तेत आलेल्या युती सरकारचे मुख्यमंत्री होते मनोहर जोशी तर उपमुख्यमंत्रिपद हे भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेंना देण्यात आलं. 1960 नंतर पहिल्यांदाच राज्यात काँग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली.

निवडूण आलेल्या अपक्ष आमदारांपैकी रामराजे नाईक-निंबाळकर, हर्षवर्धन पाटील यासारख्या अपक्ष उमेदवारांना युती सरकारमध्ये मंत्रीपद मिळालं. तर अनिलराव घोरपडे, मधुकर कांबळे, संपतराव देशमुख, राजेंद्र देशमुख, रामराजेंसारख्या अपक्ष आमदारांनी विकासाच्या जोरावर सरकारला पाठिंबा दिला होता. याच निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडूण आलेल्या अनिल देशमुख, सुनिल केदार, विजय कुमार गावित, राजेंद्र शिंगणेंनी भविष्यात राजकारणात आपले पाय अधिक घट्ट रोवले.

  • रवी राणा – बडनेरा
  • समीर भुजबळ – नांदगाव
  • राहुल जगताप – श्रीगोंदा
  • सत्यजीत पाटणकर – पाटण
  • राजेंद्र मुळक – रामटेक
  • विजय चौगुले – ऐरोली
  • सुधाकर घारे – कर्जत, रायगड
  • भिमराव धोंडे – आष्टी पाटोदा
  • रमेश आडसकर – माजलगाव
  • राजेश लाटकर – कोल्हापूर उत्तर

हेही वाचा :

“जिंकल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यावर शरद पवारांच्या उमेदवारांना तातडीचा पक्षाचा आदेश!”

“कोल्हापुरातील इचलकरंजीत पहिला गुलाल! शेवटपर्यंत रंगणार काट्याची टक्कर कोणत्या मतदारसंघात?”

“मुंबईत राजकीय रणधुमाळी: शिंदेची बैठक, पवारांचे कामनंत्र, आणि पक्षांचे मास्टर प्लॅनिंग!”