शरद पवारांना धक्का, अजित पवार पुन्हा घेणार आमदारकीची शपथ

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अजित पवार(politicsl issue) यांनी बाजी मारली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा पराभव केला आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणे बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(politicsl issue) पक्ष बाजी मारणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र पुन्हा एकदा अजित पवार यांनी या मतदारसंघात बाजी मारली आहे.

तर दुसरीकडे राज्याचे माजी गृहमंत्री आणि महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून अटीतटीच्या सामन्यात मैदान मारले. दिलीप वळसे पाटील 1014 मतांनी विजय झाले आहे. त्यांनी शरद पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त जयवंतराव निकम यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे कसाब विधानसभा मतदासंघातून महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे.

हेही वाचा :

हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती : एकनाथ शिंदे

शरद पवारांना धक्का, कागलमधून हसन मुश्रीफ यांनी उधळला विजयी गुलाल

सांगली: दहाव्या फेरी अखेर भाजपचे सुधीर गाडगीळ 25 हजार मतांनी आघाडीवर