मुंबई: काल महाराष्ट्राच्या विधानसभेचा(political) निकाल जाहीर झाला आहे. राज्यात महायुतीने अभूतपूर्व असे यश प्राप्त केले आहे. तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाकडे विरोधी पक्ष नेमण्यासाठी लागते तितकेही बहुमत नसल्याचे समोर आले आहे.
महायुतीने महाविकास आघाडीला 50 वरच रोखले आहे. दरम्यान , आता महायुतीच्या(political) नवीन सरकारचा शपथविधी 25 तारखेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान विधानसभेचे मैदान मारताच शिवसेनेने वर्षा बंगल्यावर एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पाडली. या बैठकीत मित्र पक्षांशी चर्चा करण्याचे एकनाथ शिंदे यांना सर्वाधिकार देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.
वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे आणि आमदारांची एक बैठक पार पडली. खासदार नरेश म्हसके यांनी एकनाथ शिंदे यांना मित्र पक्षांशी चर्चा करण्यासाठी सर्वाधिकार देण्याचा ठराव मांडला. तसेच आमदार सिद्धेश कदम यांनी शिवसेना विधिमंडळ गट नेते, मुख्य प्रतोद आणि इतर नेत्यांची निवड करण्याचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना देण्याचा प्रस्ताव मांडला.
महायुतीच्या नवीन सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटल्याची चर्चा सुरू आहे. भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत असे म्हटल्याचे सांगितले जात आहे. संघ परिवार देखील फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे.
आता महायुतीच्या नवीन सरकारचा शपथविधी 25 तारखेला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील मुख्यमंत्रीपदाबाबत आपले म्हणणे स्पष्ट केल्याचे म्हटले जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार चालले पाहीजे यासाठी संघ परिवार आग्रही असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजपचे संसदीय मंडळ, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची बैठक पार पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीचे नेते काय निर्णय घेतात हे पहावे लागणार आहे.
उद्या शपथविधी होणार असल्याने यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे. जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले नाहीत तर , ते भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान संघ परिवार फडणवीस यांच्यासाठी आग्रही असल्यास भाजप काय निर्णय घेते हे पहावे लागेल.
हेही वाचा :
महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएमनं? विधानसभा निकालावर आदित्य ठाकरेंचा सवाल
लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, इतका अंडरकरंट होता की विरोधक आडवे पडले : अजित पवार
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार, शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर