ऐश्वर्या रायने केली नवी सुरुवात? बोटातील डायमंड रिंगने वेधलं लक्ष

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बरेच चर्चेत आहेत. पण कधी ऐश्वर्या राय(actor) आणि अभिषेक बच्चन यांचा घटस्फोट होत असल्याच्या बातम्या येतात, तर कधी त्यांच्या काही गोष्टींमुळे या चर्चांना पूर्णविराम पडल्याचं पाहायला मिळतंय. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. नुकतच अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लेकीचा 13 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. पण यावेळी बच्चन कुटुंबियच उपस्थित नव्हतं.

यामुळे ऐश्वर्या (actor)आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. दरम्यान समोर आलेल्या फोटोंमधून ऐश्वर्याच्या बोटातील अंगठीने साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. या अंगठीवरुन सध्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. पण या अंगठीचा नेमका गोंधळ काय आहे, असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

अभिषेक आराध्याच्या बर्थडेला नव्हता. त्याचमुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. पण पुन्हा एकदा एका गोष्टीमुळे या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. या फोटोंमध्ये ऐश्वर्याच्या बोटामधील अंगठीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ऐश्वर्याच्या बोटातील ही अगंठी ही तिच्या लग्नातील आहे. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक हे अजूनही एकत्र असल्याचं म्हटलं जातंय.

याआधी ऐश्वर्या राय बच्चन फॅशन वीकसाठी परदेशात पोहोचली होती. त्यावेळीही तिने लग्नाची अंगठी दाखवून घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या होत्या. आता पुन्हा एकदा असंच काहीसं झालंय. पण याचसोबत चाहत्यांचा संभ्रम वाढलाय. कारण ऐश्वर्या रायने एका हातात वेडिंग रिंग आणि दुस-या हातात डबल डायमंड रिंग घातली होती. डबल डायमंड रिंग प्रेम आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ज्याला टू स्टोन रिंग असेही म्हणतात.

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, या जोडप्याने किंवा बच्चन कुटुंबाने या अफवांबाबत कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. बुधवारी, ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या बच्चनने दिवंगत वडील कृष्णराज राय यांची जयंती साजरी करण्यासाठी तिची आई वृंदा राय यांना भेटायला गेली होती. ऐश्वर्याने कुटुंबासोबत वेळ घालवला. यावेळी ऐश्वर्याने आराध्याचा वाढदिवसही साजरा केला. पण, या सेलिब्रेशनमध्ये ती एकटीच होती, यामध्ये अभिषेक बच्चन दिसला नाही.

हेही वाचा :

…अन् तो फडणवीसांना उचलून घेत नाचू लागला; भन्नाट Video Viral

लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, इतका अंडरकरंट होता की विरोधक आडवे पडले : अजित पवार

‘वर्षा’वर शिवसेनेची महत्वाची बैठक; एकनाथ शिंदेंबाबत पक्षाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय