निकालानंतर शिंदे गट अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व निकाल जाहीर झाला आहे. मात्र या निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता(clashes). परंतु हिंगोलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोलीत मतमोजणी दरम्यान शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला आहे. त्यामुळे हिंगोलीमध्ये तणावाचे वातारण पसरले होते.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, हिंगोलीमध्ये काल विधानसभा निवडणुकीच्या निकालावेळी शिवसेना शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा(clashes) झाला आहे. याबेली शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मिळून भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या घरावर हल्ला केला आहे. या घटनेत पप्पू चव्हाण यांच्या घरा समोरील दोन चारचाकी गाड्या देखील फोडण्यात आल्या आहेत.

मात्र या धक्कयादक राड्यात गोळीबार देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. कारण कळमनुरी विधानसभेत विजयी झालेले संतोष बांगर यांच्या पुतण्याला थेट गोळी लागल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर जखमी तरुणाला तातडीने हैद्राबाद येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. याशिवाय या घटनेतील इतर ३-४ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेत धारदार शस्राने पप्पू चव्हाण यांच्या भावाला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांच्यावर सुद्धा रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र या संपूर्ण घटनेनंतर पप्पू चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये 60 ते 70 जणांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेमुळे हिंगोली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा :

महाविकास आघाडीला महाराष्ट्राने नाकारले

Run Out ची हूल देणाऱ्या ऑस्ट्रेलियन दिग्गजाला जयसवालने डिवचलं….. Video Viral

ऐश्वर्या रायने केली नवी सुरुवात? बोटातील डायमंड रिंगने वेधलं लक्ष