“तू आमदार कसा होतो तेच बघतो”; अजित पवारांनी खुल आव्हान दिलेला तो नेता हारला की जिंकला?

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेली विधानसभा निवडणुकीची धामधूम काल अखेर कमी झाली. आता सत्ता स्थापनेकडे आणि मुख्यमंत्रीपदाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्यात महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं, तर महाविकास (politics)आघाडीला मोठा फटका बसला. या दरम्यान असे काही महत्त्वाचे मतदासंघ होते त्याकडे लक्ष वेधलं गेलं होतं. दरम्यान लोकसभा निवडणुकीचा वचपा महायुतीने विधानसभेला काढल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवारांच्या पक्षातील एका बड्या नेत्याला तू आमदार कसा होते ते मी पाहतो, असं आव्हान दिलं होतं. त्या आमदारांचं निवडणुकीत काय झालं यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिरुरचे(politics) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे नेते अशोक पवार यांना भरसभेत खुलं आव्हान दिलं होतं. त्यांना तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय? अशा शब्दात खुलं आव्हान दिलं होतं. या विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अशोक पवार यांना शिरुरमधून उमेदवारी दिली होती. तर त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ज्ञानेश्वर कटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं होतं.

शिरूर मतदारसंघातून अजित पवारांच्या उमेदवाराने दणदणीत विजय मिळवला आहे, ज्ञानेश्वर कटके यांना 192281 इतकी मतं मिळाली आहेत. तर अशोक पवारांना 117731 इतकी मते मिळाली आहे. 74550 मतांच्या फरकाने अजित पवारांचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे अजित पवारांनी दिलेलं आव्हान पूर्ण केल्याच्या चर्चा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांनी सुरू आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची शिरूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना खुलं आव्हान दिलं होतं. “आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय?”,असं अजित पवारांनी आव्हान दिलं होतं.

“दिलीप वळसेंचा शपथविधी झाला आणि यांची सटकली. ते म्हणाले, दादांनी दिलीप वळसे पाटलांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं. दादा एकटे जिल्ह्यातून गेले असते तरी आमची कामं झाली असती. त्यांच्या डाव्या आणि उजव्या हाताला कोण आमदार बसले होते. त्यांच्या कानात यांनी अशोक पवार यांनी असं सांगितलं.”

“आता अशोक पवार काय म्हणत होते ते मला त्या आमदारानं सांगितलं. त्यानंतर ते तिकडे गेले. त्यांना पवार साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तुच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाले. आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय? अजित पवारांनी एकदा मनावर घेतलं तर मी आमदार होऊ देत नाही. आता मी पण चॅलेंज देतो तु आमदारच कसा होतो ते बघतो. मी लोकांना सांगेन की यांची खरी औकात काय आहे”, असं आव्हान लोकसभेच्यावेळी भर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना दिलं होतं.

हेही वाचा :

निकालानंतर शिंदे गट अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

महाविकास आघाडीला महाराष्ट्राने नाकारले

महायुतीच्या वादळात महाविकास आघाडीची वाताहत; ‘या’ मातब्बर नेत्यांना बसला धक्का