IPL ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने KKR चा माणूस फोडला

जगातील सर्वात मोठ्या लिगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) या स्पर्धेच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. दुसऱ्यांदा हे ऑक्शन भारता बाहेर आयोजित करण्यात आले असून सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात ऑक्शन पार पडेल. या ऑक्शनसाठी तब्बल 1500 हुन आधी खेळाडूंनी नोंदणी केली होती, मात्र यापैकी केवळ 577 खेळाडूंवरच प्रत्यक्ष ऑक्शनसाठी निवडण्यात आले ज्यामुळे संपूर्ण(match) क्रिकेट जगताच लक्ष याकडे लागले आहे. ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने कोलकाता नाईट रायडर्सच्या गटातील एक माणूस आपल्या गटात घेतला आहे. त्यामुळे सीएसके ऑक्शन टेबलवर कसा खेळ खेळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकले. आयपीएल 2024 च्या मिनी ऑक्शनमध्ये केकेआरने ज्या खेळाडूंवर मोठा दाव लावला त्यांनी चांगली कामगिरी केली. ऑक्शनमध्ये या खेळाडूंच्या निवड प्रक्रियेमध्ये केकेआरचा विश्लेषक एआर श्रीकांत याची महत्वाची भूमिका होती. मात्र आता(match) आयपीएल मेगा ऑक्शनपूर्वी एआर श्रीकांतला चेन्नई सुपरकिंगने आपल्या गटात सामील केले आहे. महिन्याभरापूर्वी एआर श्रीकांत चेन्नई सुपरकिंग्सच्या टॅलेंट स्काउटमध्ये सहभागी झाला असून 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या मॉक ऑक्शनमध्ये तो चेन्नईच्या टेबलवर त्यांच्या टीम सोबत बसलेला दिसला.

तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने ऑक्शनपूर्वी आपल्या 5 खेळाडूंना रिटेन केलं आहे. यात ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, एम एस धोनी, पथीराना आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. तेव्हा आता संघातील उर्वरित जागांसाठी सीएसके कोणावर दाव लावणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. ऑक्शनमध्ये नव्या खेळाडूंना विकत घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्सच्या पर्समध्ये 55 कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे एवढ्या पैशात ते कोणत्या खेळाडूंना संधी देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

चेन्नई सुपरकिंग्स आयपीएल ऑक्शनमध्ये रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, आर अश्विन, डेव्हॉन कॉनवे, ऋषभ पंत, तुषार देशपांडे, दीपक चहर , शार्दुल ठाकूर, ईशान किशन, हर्षल पटेल या 10 खेळाडूंसाठी बोली लावू शकते.

हेही वाचा :

महायुतीच्या वादळात महाविकास आघाडीची वाताहत; ‘या’ मातब्बर नेत्यांना बसला धक्का

निकालानंतर शिंदे गट अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा

“तू आमदार कसा होतो तेच बघतो”; अजित पवारांनी खुल आव्हान दिलेला तो नेता हारला की जिंकला?