महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण योजना’ची घोषणा केली(Good news). या योजनेला राज्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या योजनेचा महायुती सरकारला मोठा फायदा झालाय. मतदारांनी महायुतीला कौल दिलाय. ही योजना निवडणुकीत गेमचेंजर ठरली आहे. महाविकास आघाडीकडूनही निवडणुकीत ‘महालक्ष्मी योजना’ची घोषणा करण्यात आली होती. मविआने लाडक्या बहीणींना 3000 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, तरीही मविआचा दारुण पराभव झाला.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/11/image-392-1024x819.png)
आता महायुतीचे सरकार पुन्हा आले आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडक्या बहीणींच्या(Good news) हप्त्यात वाढ करत 2100 रुपये देणार, असं म्हटलं होतं. आता महायुती आपला शब्द पाळणार की नाही, त्याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे.
शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. विरोधकांना विरोधी नेता बनवायला संख्या नाही, तुम्ही साफ धूऊन टाकलंय अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी लाडक्या बहिणींचे कौतुक केले.
राज्यात यंदा लाडक्या बहिणींची लाट होती आणि त्यात विरोधक वाहून गेले, हा चमत्कार लाडक्या बहिणींनी केला. त्यामुळे, हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आता, लवकरच तुम्हाला देण्यात येणाऱ्या 1500 रुपयांचे 2100 करणार असून याचासुद्धा निर्णय आपण घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे
दरम्यान, आतापर्यंत राज्यात 2 कोटी 26 लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करण्यात आले आहेत. निवडणुकीमुळे मध्यंतरी योजनेचे हप्ते तूर्तास थांबवण्याचा निर्णय महिला व बालकल्याण खात्याने घेतला होता.
आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसेच, सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे देखील एकत्रित जमा केले होते. त्यामुळे महिलांना आता डिसेंबरमधील हप्ता कधी मिळणार, याची प्रतिक्षा आहे.या डिसेंबरमध्ये महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत.
हेही वाचा :
491 दिवसांनी संपली प्रतीक्षा! ‘किंग कोहली’चा धमाका
महिलेचा धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न अन्; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले…
“ठाकरेंचे पाच आमदार आमच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ!