‘कोण किशोर कुमार?’ आलिया भट्टच्या प्रश्नानं रणबीरला बसला धक्का

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या 55 व्या IFFI फिल्म फेस्टिवलमध्ये(film festival) रणबीर कपूरनं हजेरी लावली होती. यावेळी रणबीर हा दिग्दर्शक राहुल रवैल यांच्यासोबत अनेक गोष्टींवर चर्चा करत असताना त्यानं खुलासा केला की राज कपूर यांच्या 100 व्या जयंती निमित्तानं 13 ते 15 डिसेंबरपर्यंत कपूर कुटुंब हे संपूर्ण देशात राज कपूर फिल्म फेस्टिवलचं आयोजन करणार आहे. त्याशिवाय त्यानं सांगितलं की कलाकारांची लोकांना कशी विसर पडते त्याचं उदाहरण देत त्यानं आलियाला किशोर कुमार कोण होते हे माहित नाही याविषयी सांगितलं. 

या फिल्म फेस्टिवलसाठी(film festival) रणबीर कपूरचे काका कुणाल कपूरनं एनएफडीसी, एनएफएआय आणि फिल्म हेरिटेड ऑफ इंडियासोबत मिळून राज कपूर यांच्या चित्रपटाला रिस्टोर करण्याचं काम केलं. आता त्यांनी कमीत कमी 10 चित्रपटांमध्ये री-स्टोर केलं आहे.

या कार्यक्रमात त्यानं यावेळी आलियासोबतची त्याची पहिली भेट कशी होती याविषयी सांगितलं. त्यावेळी लोकं कसे कलाकारांना विसरतात याची जाणीव झाल्याचं थोडक्यात रणबीरनं सांगितलं. रणबीरनं म्हणाला की ‘खूप लोक आहेत, ज्यांनी त्यांचं काम पाहिलं नाही.

उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा मी पहिल्यांदा आलियाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिनं मला विचारलं होतं की किशोर कुमार कोण आहेत? तिला त्यांच्याविषयी काही माहित नव्हतं, मला या गोष्टीचं फार आश्चर्य वाटलं. तर हे लाइफ सर्कल आहे. कलाकार विसरतात आणि नवीन कलाकार येतो. हे खूप गरजेचं आहे की आपण आपलं मुळ कधीच विसरायला नको.’

रणबीरनं हे यावेळी याविषयी देखील सांगितलं की ‘जर त्याचा कोणता असा चित्रपट त्याच्या आजोबांनी दिग्दर्शित करायला हवा असं त्याला वाटतं. त्यानं सांगितलं की त्यांनी बॉबी हा चित्रपट बनवला होता आणि ते लव्ह स्टोरीज बनवायचे. त्यामुळे त्यांनी कोणता माझा चित्रपट दिग्दर्शित करावा असा विचार आला तर त्यांनी ‘ये जवानी है दीवानी’ दिग्दर्शित करताना मला पाहायचं आहे.’

हेही वाचा :

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार..; मग एकनाथ शिंदेंच काय?

पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक धक्का, मनसेचं ‘इंजिन’ धोक्यात?

नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार? विधासभेतील अपयशानंतर पटोलेंचा मोठा निर्णय