महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी(news) समोर आली आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी माहिती समोर आलीये. येत्या दोन दिवसात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर नाराज एकनाथ शिंदेंची समजूतही काढण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/11/image-446-1024x819.png)
एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नवं सरकार स्थापन होईपर्यंत आणि नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेईपर्यंत ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत.
फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला भाजपच्या सर्व आमदारांचा पाठिंबा आहे(news). समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं जाणार आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं जाणार आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालय राहणार आहे.
दोन दिवसांच्या चर्चेनंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न सुटला असून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री असतील अशीही माहिती आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या नावाला दिल्लीतून पसंती मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदेंची ही नाराजी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून दूर केली जात आहे.
हेही वाचा :
‘आयुष्यातील सर्वात कठीण…’, दिल्लीचा निरोप घेताना ऋषभ पंतने चाहत्यांना रडवलं! Video
‘कायम स्वत:साठी उभं राहा…’, घटस्फोटाच्या चर्चा सुरु असतानाच ऐश्वर्याचा व्हिडीओ चर्चेत
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय