मुंबईमधील अंधेरी भागातील वीरा देसाई रोडवर असलेल्या सहा मजली निवासी इमारतीला(building) आज (२७ नोव्हेंबर) सकाळच्या वेळेत भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी नऊच्या सुमारास इमारतीतील एका घरात आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून घर पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी (पश्चिम) येथील चिंचन बिल्डिंगमधील(building) एका फ्लॅटमध्ये सकाळी 8.42 वाजता आग लागली. अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की सकाळी ९ वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली आणि घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमनच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
पोलिस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने इमारतीमधील सर्व रहिवाश्यांना बाहेर काढणयात यश आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरीही मोठी वित्तहानी झाली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असले तरीही ही आग वाढताना दिसतंय. इमारत पूर्णपणे खाली करण्यात आली. मात्र, ही इतकी मोठी आग नेमकी कशाने लागली, याबद्दल अजून माहिती मिळू शकली नाहीये. आगीचे कारण अस्पष्ट आहे. आता या आगी प्रकरणाचा तपास हा स्थानिक पोलिस प्रशासन आणि अग्नीशामक दलाकडून केला जातोय.
नुकतेच 26 नोव्हेंबर रोजी कल्याणमधील आधारवाडी परिसरातील प्रसिद्ध व्हर्टेक्स हौसिंग सोसायटीमधील सतराव्या आणि अठराव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागली. आगीमुळे इमारतीतून मोठा धुराचा लोट निघाल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
#Mumbai अंधेरी के वीरा देसाई रोड पर स्थित एक residential building में लगी भीषण आग..यह आग 6th फ्लोर के एक फ्लैट में लगी..आज सुबह 9 बजे लगी आग..हादसे में कोई घायल नही.. आग पर काबू पाने की कोशिश जारी #Fire@TNNavbharat @MumbaiPolice pic.twitter.com/GbiaKBF5FS
— Atul singh (@atuljmd123) November 27, 2024
आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या आठ ते नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाचे जवान युद्धपातळीवर आग विझवण्याचे आणि इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अनेक रहिवासी इमारतीत अडकून पडल्याने बचावकार्य सुरू होते. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा :
एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली, भाजपकडे केली सर्वात मोठी मागणी
विरोधक उभारणार EVM विरोधातला लढा; कायदेशीर, रस्त्यावरची लढाईसाठी महाविकास आघाडी सज्ज
“अदानी जेलमध्ये असले पाहिजेत, सरकार त्यांना वाचवतंय”,राहुल गांधी यांची मागणी