‘मला मोदींचा फोन आला होता…’; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मुंबई : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर ही मुख्यमंत्रीपदाबाबत(political consultant) प्रचंड मोठा सस्पेंस कायम होता. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरु होत्या. आज एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत आपला निर्णय जाहीर केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्याचं स्पष्ट झालं.

मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा(political consultant) फोन आला होता. मी त्यांना सांगितलं की, माझ्यामुळं कोणतीही अडचण होणार नाही. तुम्ही जो निर्णय घ्याल, तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. तुमच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे काही अडचण आहे का असं वाटू देऊ नका. सरकार बनवताना माझा अडसर ठेवू नका. तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मला मान्य असेल. मी मोदी आणि शाह यांना फोनवर सांगितलं, असंही शिंदेंनी यावेळी सांगितलं.

एकनाथ शिंदें यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी कुठेही मुख्यमंत्रीपदाचा दावा केलेला नाही. अडीच वर्षांच्या प्रवासाबाबत मी समाधानी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री होणार नाही हे संकेत त्यांनी दिले आहेत. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे. मुख्यमंत्री असतानाही मी कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि उद्याही मी कार्यकर्ता म्हणून असेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आपण कुठल्याही प्रकारे नाराज नाही, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. असा विजय यापूर्वी कधी मिळाला नव्हता. त्यामुळे संपूर्ण जनतेचे आभार व्यक्त करतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा :

‘लग्नाआधी सेक्स करणं…’, अभिनेत्री रेखा यांचा मोठा खुलासा!

श्रीकांत शिंदे होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री?; ‘या’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ

‘आता मुंबईचा महापौरही आमचा असेल’; भाजपच्या तयारीने उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं