विनोद तावडेंची एन्ट्री अन् महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत पुन्हा सस्पेन्स वाढला

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय(political)सरचिटणीस विनोद तावडे यांची काल रात्री दिल्लीत भेट झाली. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रि‍पदाबाबत अमित शाह यांनी विनोद तावडे यांना बोलावून घेतले होते. यावेळी मराठा चेहरा नसल्यास होणाऱ्या परिणामांविषयी अमित शाह यांनी विनोद तावडे यांच्यासोबच चर्चा केल्याची सूत्रांनी माहिती आहे.

अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात महाराष्ट्र, मुख्यमंत्री(political) आणि मराठा या समीकरणावर चर्चा झाली. अमित शाह यांनी विनोद तावडेंकडून महाराष्ट्रातील मराठी समाजाची समीकरणं समजून घेतली. देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाची मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीजवजाबाकी करण्यात आली. मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखावण्याची चिंता केंद्रीय नेतृत्वाला आहे.

मराठा समाज आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आढावा घेतला. भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच 2014 ते 2024 पर्यंत मराठा समाजाची आंदोलन, कोर्टाचे निकाल, मराठा नेत्यांची भूमिकेचा आढावा घेतला. भवितव्याच्या दृष्टीनं मराठा चेहरा किती महत्वाचा आहे. याबाबत सर्व गणितांची मांडणी करण्यात आली. आगामी निवडणुका, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि मराठा, ओबीसीचा मतांबाबत चर्चा झाली.

आम्ही नाराज वगैरे नाही, आम्ही नाराज होणारे नाही लढणारे लोक आहोत. एवढा मोठा विजय मिळाला, आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय…असा ऐताहासिक विजय आहे. माझ्या रक्तातील शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातील जनतेसाठीच करेल. मला काय मिळालं, यापेक्षा या महाराष्ट्रातील जनतेला काय मिळालं हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. महिलांना दिलेले पैसे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुन्हा मार्केटमध्ये येत आहेत. सर्वांना माझ्याबद्दल वाटतं ही आपल्या घरातील व्यक्ती आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

माझं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलणं झालं. मी त्यांना म्हटलं, तुम्हाला आमच्यामुळे कुठेही अडचण होईल, असं आम्ही काहीही करणार नाही. मी त्यांना म्हटलं तुम्ही निर्णय घ्या…कोणताही निर्णय घ्या..निर्णय घेताना माझी अडचण आहे, असं काही वाटून घेऊ नका. मी अमित शाह यांना देखील हेच सांगितलं, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा :

धक्कादायक! विजेच्या तारांवर लटकून तरुणीचा हाय व्होलटेज ड्रामा

‘मला मोदींचा फोन आला होता…’; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

‘फेंगल’ चक्रीवादळाचा अंदमान समुद्रात मोठा विध्वंस; भारतात ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा