कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: फार पूर्वी म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसचीच सत्ता होती तेव्हा प्रत्येक निवडणुकीत”विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारला आणि त्याची घडी घातली, की तो शिक्का काँग्रेसच्या गाय वासरू चिन्हावर जातो. म्हणजे शाईची बाई होते”अशी तक्रार विरोधक करायचे. तेव्हा बॅलेट पेपर होता. आता बॅलेट पेपरची जागा ईव्हीएम मशीनने घेतल्यानंतर अशाच प्रकारची
तक्रार महाराष्ट्रातील विरोधी पक्षांकडून सुरू झाली आहे. त्याला”ओ …रड”कथा म्हणावी लागेल. कारण सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम (EVM)मशीन बद्दलचे सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश प्राप्त केले होते. तेव्हा त्यांनी मतदान यंत्राबद्दल तक्रार केलेली नव्हती. विधानसभा निवडणुकीत हाच आपला स्ट्राइक रेट असेल अशा आत्मविश्वासात ही आघाडी होती. प्रत्यक्षात मात्र आघाडीच्या भ्रमाचा भोपळा फुटला. अतिशय लाजिरवाण्या पराभवाला ही आघाडी सामोरे गेली आहे. आता या महापराभवाचे खापर कोणाच्यातरी माथी फोडले पाहिजे, म्हणून मग या मंडळींनी ईव्हीएम (EVM)मशीन बद्दल संशय घ्यायला सुरुवात केली आहे. ईव्हीएम मशीन नको, बॅलेट पेपर हवा या मागणीसाठी आता हे पक्ष म्हणे राज्यभर आंदोलन करणार आहेत. बॅलेट पेपरवर मतदान घ्यावयाचे असेल तर कागद बहुतांशी रशियातून आयात केला जातो, समजा बॅलेट पेपरवर एखाद्या पक्षाने भरघोस यश मिळवले तर हेच विरोधक म्हणतील कागद परदेशी होता आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मैत्री आहे. एकूणच आपला पराभव का झाला याचे आत्मचिंतन करण्याऐवजी ही मंडळी ईव्हीएम मशीन बद्दल मोठ्याने तक्रार करू लागले आहेत.
ईव्हीएम तक्रार घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या काही राजकीय पक्षा ्या पुढार्यांना सर्वोच्च न्यायालयाने चांगले आहे. ईव्हीएम मशीन हे हॅक होऊ शकते किंवा त्यामध्ये सत्ताधारी पक्ष गडबड करू शकतात असे पुराव्यानिशी अद्यापही सिद्ध झालेले नाही.
निवडणूक जिंकली की ईव्हीएम मशीन चांगले आणि निवडणूक हरली की या मशीन मध्ये काहीतरी गडबड आहे असे म्हणायचे हे योग्य नाही अशा शब्दात या संदर्भातील याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे.
शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता जेव्हा सहकारी पक्षाच्या आवाजात आपला आवाज मिसळतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.
नीला सत्यनारायण या निवृत्त सनदी अधिकारी आहेत. त्यांनी काही काळ राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून कामही पाहिले आहे. त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी गुजरात मधून ईव्हीएम मशीन का मागवली? असा प्रश्न उपस्थित करून मतदान यंत्राबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्यांनी याआधी नोकरीत असताना अशा प्रकारचा संशय व्यक्त केलेला नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
राज्यातील अनेक राजकीय विश्लेषकांनी तसेच जेष्ठ विचारवंतांनी विधानसभा निवडणूक महायुतीने का जिंकली? त्याच्या मागची कारणे काय? याचे विवेचन केले आहे. त्यावर सुद्धा ही मंडळी विश्वास ठेवायला तयार नाहीत. ईव्हीएम मशीन मतदानासाठी सज्ज करण्यापासून ते मतदान झाल्यानंतर सील करण्यापर्यंतची प्रक्रिया क्लिष्ट असते आणि ती उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर पार पाडली जाते. हे मशीन कोणत्याही तंत्रज्ञाला हॅक करता येत नाही. किंवा त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गडबड करता येत नाही.
महायुतीला या विधानसभा निवडणुकीत काठावरील बहुमत मिळाले असते तर महाविकास आघाडीने मतदान यंत्राबद्दल आक्षेप घेतला नसता. आमच्या हातात येणारी राज्याची सत्ता थोडक्यात
आमच्या हातून गेली. त्यांच्याकडून पैशाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला म्हणून त्यांना हे काठावरचे यश मिळाले आहे अशा प्रतिक्रिया शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, संजय राऊत या मंडळींनी मीडियासमोर दिल्या असल्या.
पण या निवडणुकीत आपल्या आघाडीचा पराभव झाला याच्यापेक्षा घटक पक्षातील कोणाही एका पक्षाला राज्याचे विरोधी पक्ष नेते पद मिळू शकत नाही हे दुःख त्यांना जास्त आहे. इतका महा पराभव थेट स्वीकारणे ऐवजी त्यांनी ईव्हीएम मशीनला चर्चेत आणले आहे.
हेही वाचा :
पिटुकल्या हत्तीचा मजेदार डान्स! तरुणींच्या चालींची केली नक्कल; क्युट…Video Viral
तरुणाचा धाडसी कारनामा सापांच्या झुंजीतून एकाला उचलले VIDEO पाहून थक्क व्हाल
या शुभ दिवसांमध्येच चांदीच्या वस्तू खरेदी करा, तुमच्या घरात येईल समृद्धी