झारखंडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक भयानक घटना समोर आली आहे, जिथे एका तरुणाने आपल्या(girlfriend) प्रेयसीवर बलात्कार करून तिची हत्या केली आणि मृतदेहाचे 40 तुकडे करून जंगलात फेकून दिले. या क्रूर घटनेने स्थानिकांमध्ये संताप निर्माण केला आहे.
2022 मध्ये दिल्लीत घडलेल्या श्रद्धा वालकर हत्त्याकांडाची ही पुनरावृत्ती आहे. प्रियकर आफताब याने त्याची (girlfriend)प्रेयसी श्रद्धाची हत्त्या करून शरीराचे तुकडे केले होते व वेगवेगळ्या ठिकाणी फेकले होते. झारखंडमधील डुमरी जिल्ह्यात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण व पीडिता गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंधात होते. काही मतभेदांमुळे आरोपीने पीडितेला एका निर्जन ठिकाणी नेले आणि तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. यानंतर, आरोपीने मृतदेहाचे 40 तुकडे केले आणि जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले.
पोलिसांना घटनास्थळी काही पुरावे सापडले, ज्याच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे. या क्रूर कृत्याने संपूर्ण समाजाला हादरवून सोडले आहे आणि महिला सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाले आहेत.
हेही वाचा :
ललित मोदीच्या विधानाने आयपीएल हादरले, पंचांकडून फिक्सिंग केल्याचा संघ मालकावर आरोप
सुरेश हाळवणकरांना मंत्रीपद दिल्यास, भाजपची जिल्ह्यातील ताकद दुप्पट होणार
लग्नासाठी नवरा शोधणाऱ्या महिलेची गेटवे ऑफ इंडिया येथे पोस्टरबाजी… Viral Video