दिल्लीच्या बैठकीत मोठी खलबतं; 20 मिनिट चर्चा अन् शाहांसमोर एकनाथ शिंदेंनी ठेवले मोठे प्रस्ताव

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. महायुतीने मुख्यमंत्रि‍पदाचा(political issue) चेहरा स्पष्ट केलेला नाही. याचसंदर्भात काल दिल्लीमध्ये अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठक झाली. अमित शाह़, एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांसह इतर नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासह खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात आज मुंबईत देखील महायुतीची बैठक होणार आहे.

दिल्लीत अमित शाहंची(political issue)बैठक होण्यापूर्वी तिन्ही नेत्यांची बैठक झाली. सुमारे 20 मिनिट ही बैठक चालली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी काही प्रस्ताव अमित शाह यांच्यासमोर ठेवले आहेत. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा दावा सोडला होता. खरं तर भाजपश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय मान्य असेल, असं देखील शिंदे म्हणाले होते.

दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाहंसमोर प्रस्ताव ठेवल्याचं समोर आलंय. शिवसेनेला जर मुख्यमंत्रिपद मिळणार नसेल तर सध्या असलेल्या खात्यांपैकी पाच वजनदार खाती शिवसेनेला मिळाली पाहिजे. उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार असेल तर अर्थ किंवा गृहपैकी एक पद मिळावी, अशी एकनाथ शिंदे यांनी अपेक्षा व्यक्त केलीय. या बैठकीतील एक फोटो समोर आलाय. यातील एकनाथ शिंदे यांची देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव मात्र स्पष्ट होत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर काल शिवसेनेची भूमिका मांडली. शिंदेंनी पक्षाकडून 12 मंत्रिपदांचीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी केली. मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह मपालकमंत्री पद देताना पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांना विनंती केली.

दरम्यान अमित शाहांसोबतची बैठक सकारात्मक झालीय. येत्या 2 दिवसांमध्ये निर्णय होईल, अशी देखील माहिती एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर दिलीय. कोणतीही नाराजी नसून आम्ही तिघे एकत्र काम करणार असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिलेली.

हेही वाचा :

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा पुन्हा ईडीच्या रडारवर

आता भाकरी कशी फिरवणार? महाराष्ट्राला सतावणारा प्रश्न

काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीचा पराभव; ठाकरे गटाच्या नेत्याचा आरोप