ओटीटीवर एकामागे एक वेगवेगळ्या अशा क्राइम सीरिज पाहायला मिळत आहे. त्यातील अनेक गोष्टी या सत्य घटनेवर आधारीत आहेत. पण एक अशीच भयावह आणि सत्य घटनेवर आधारीत आहे. त्यातही ही घटना एका अभिनेत्रीच्या मर्डरवर आधारीत आहे. ही गोष्ट झारखंडमधील चित्रपटसृष्टीतील आहे ती एक अशी अभिनेत्री जिच्यावर गोळी झाडली आणि आणि तिच्या(Dead body) पार्थीवाला कारच्या डिक्कीत टाकून तिचा नवरा गाडी फिरवत होता.
झारखंडमधील दिग्दर्शक प्रकाश हे त्यांच्या गाडीच्या डिक्कीत पत्नीचं (Dead body)पार्थीव आणि तीन वर्षांच्या मुलीला घेऊन पोलिस स्टेशन पोहोचले होते. हे पार्थीव झारखंडच्या चित्रपटसृष्टीत काम करणारी नावाजलेली अभिनेत्री ईशा आलियाचं होतं. ईशा आलियाचं खरं नाव रिया कुमारी होतं. महत्त्वाचं म्हणजे दिग्दर्शक प्रकाश जेव्हा पोलिसांकडे गेले तेव्हा ते तिथे जाऊन म्हणाले की माझ्या गाडीच्या डिक्कीत एक पार्थीव आहे. पोलिसांनी डिक्की उघडली आणि ते पार्थीव कोणाचं आहे हे पाहिलं त्यानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. कारण ते पार्थीव लोकप्रिय अभिनेत्री ईशा आलियाचं होतं. तिचे संपूर्ण कपडे हे रक्तानं माखलेले होते. दरम्यान, ‘भास्कर’नं दिलेल्या रिपोर्टनुसार, या 24 तासाच्या संपूर्ण मर्डर मिस्ट्रीवर ही पटकथा आधारीत आहे.
प्रकाश यांनी पोलिसांना माहिती दिली होती की दरोडेखोरांनी त्यांच्या पत्नीची हत्या केली. त्यामुळे पोलिसांना पडलेला प्रश्न म्हणजे जर दरोडेखोरांनी हल्ला केला आणि गोळ्या झाडल्या तर फक्त ईशा आलियावर का? जर त्यांना चोरी करायची होती तर हत्या का केली? आता या सगळ्या प्रश्नांचा गुंथा लवकरट सुटणार अशी आशा चाहत्यांना लागली आहे.
प्रकाशनं पोलिसांना जी गोष्ट सांगितली त्यावरून त्यांनी सांगितलं की सकाळी जवळपास 6 वाजता रांची-हावडा हायवेच्या बगनान असा प्रवास करत असताना टॉयलेटसाठी एक निर्जनस्थळी थांबलो. तर तिथे 3 दरोडेखोर आले. त्यांनी ईशाची पर्स खेचली आणि गाडीतून सगळा सामाना चोरी केली. त्यावेळी ईशाच फक्त गाडीतून उतरली होती आणि दरोडेखोरांनी तिच्यावर हल्ला केला.
इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना ईशा आलियाची भेट दिग्दर्शक प्रकाश अलबेलाशी झाली होती. हळूहळू मैत्रिचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न केलं. ईशा आणि प्रकाश यांना एक मुलगी आहे. लग्नानंतर देखील ईशा ही चित्रपट आणि म्युजिक व्हिडीओमध्ये काम करायची.
ईशा आलिया ही झारखंडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आलियानं भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यानं ‘एगो गोरी’, ‘दे दे मां दर्शन’, ‘फूलों बहारों में’, ‘रूपा सजाले गे’, ‘नशा तोर प्यार कर’ आणि अनेक म्युजिक व्हिडीओमध्ये काम केलं होतं. त्याशिवाय तिचं स्वत: चं एक यूट्यूब चॅनल देखील होतं. त्यावर तिचे लाखो सबस्क्रायबर्स देखील होते.
हेही वाचा :
मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसतानाच आता एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आज राशी परिवर्तन योगासह बनले अनेक शुभ योग; 4 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार
टीम इंडिया दिसणार नव्या रुपात! भारताची नवी जर्सी…