मुंबई : हरियाणासारखाच महाराष्ट्रातही आपल्या पक्षाचा दारुण पराभव होऊ शकतो, याचा स्पष्ट अंदाज काँग्रेसला (Congress) गेल्या ऑक्टोबरमध्ये म्हणजेच प्रत्यक्ष मतदानाच्या महिनाभर आधीच आला होता. ऑक्टोबरमध्ये पक्षाने 103 जागांचे सर्वेक्षण केले होते. त्यातून हाती आलेल्या निष्कर्षानुसार काँग्रेसला परिस्थिती प्रतिकूल असल्याची जाणीव झाली होती.
आता फक्त आपली कातडी वाचवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस(Congress) तसेच दिल्लीतील वरिष्ठ नेते ईव्हीएमला दोष देत आहेत, अशी भावना त्याच पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात व्यक्त होत आहे. दिल्लीतील सूत्रांकडून येणाऱ्या बातम्या तेच सांगत आहेत. महाविकास आघाडीसाठी भक्कम मानल्या जाणाऱ्या झालेल्या बैठकीत सहभागी एका नेत्याने सांगितले की, पक्षाच्या रणनीतीकारांनीही महायुतीची लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरत असल्याचे सांगितले होते.
त्यावर उत्तर म्हणून जाहिरनाम्यात योजना द्यावी लागेल, असे त्यांचे म्हणणे होते. महिलांना दरमहा 3000 रुपयांची गॅरंटी देण्याचा आग्रह त्यांनी केला. परंतु, तोवर महायुतीच्या नेत्यांनी 1500 रुपयांची लाडकी बहीण दरमहा 2100 करण्याची घोषणा करून टाकली होती.
महाराष्ट्रात काँग्रेसकडून 103 जागांवर खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षणही केले होते. यातील 54 जागांवर काँग्रेस लोकसभेला पुढे होती. काँग्रेसच्या सर्वेक्षणात तरुण मतदारांचा कल महायुतीकडे वाढल्याचे जाणवले होते. अन्य वयोगटाचीही तीच गत होती.
खुल्या प्रवर्गासह ओबीसी, विशेष मागास प्रवर्ग, दलित, आदिवासी व मराठा समजाच्या सर्वेक्षणातील सहभागींचा टक्का महायुतीकडे वाढलेला दिसला.
82 टक्के लोकांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ कुटुंबातील महिलेला प्रत्यक्ष मिळाल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे 17 टक्के लोकांनी लोकसभेनंतर आपले मत आता बदलले असल्याचेही स्पष्टपणे सांगितले होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीचा निकालही जाहीर झाला आहे. यामध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. या निकालाला आता आठवडा होत आहे. तरी नव्या सरकारबाबतचा मुद्दा अजूनही अडकला आहे. शुक्रवारी मुंबईत होणारी महायुतीची महत्त्वाची बैठक पुढे ढकलून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक साताऱ्यात गेले. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा :
टीम इंडिया दिसणार नव्या रुपात! भारताची नवी जर्सी…
मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसतानाच आता एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
अभिनेत्रीचा मृतदेह गाडीच्या डिक्कीत ठेवून फिरत होता नवरा; CCTV फुटेज पाहून पोलिसांना बसला धक्का