उद्धव अन् राज ठाकरे एकत्र येणार? दानवे म्हणाले, “एकत्र यायचं की नाही यावर..”

राज्याच्या विधानसभा(politics) निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून 50 जागाही जिंकता आल्या नाही. उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली नाही. कशातरी 20 जागा आणता आल्या. दुसरीकडे त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे यांच्या मनसेला तर भोपळाही फोडता आला नाही.

राज ठाकरेंनी 125 मतदारसंघात उमेदवार दिले. काही ठिकाणी सभा घेतल्या. सभांना तुफान गर्दीही झाली. मात्र नेहमीप्रमाणे या गर्दीचं रुपांतर मतांत झालं नाही. मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. इतकेच नाही तर पक्षाच्या तब्बल 119 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं.

यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. एकत्र यायचं की नाही याबद्दल ते दोन नेतेच ठरवू शकतात असे दानवे म्हणाले आहेत.

ठाकरे ब्रँड(politics) पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत यावर काय सांगाल असे विचारले असता दानवे म्हणाले, निवडणुकीत पराभव झाला की अशा चर्चा सुरू होतात. मागील निवडणुकीवर नजर टाकली तर लक्षात येईल की निकालानंतर काही दिवस अशा चर्चा रंगत असतात. पण एकत्र यायचं किंवा नाही यावर ते दोन नेतेच निर्णय घेऊ शकतात. आम्ही यावर काहीच बोलू शकत नाही.

राज ठाकरे काय भूमिका घेतात कुणालाच कळत नाही. निवडणुकीच्या काळात ते सरकारच्या बाजूने होते की विरोधात हा प्रश्न होताच. विरोधात असतील असं म्हणायचं तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रि‍पदासाठी पाठिंबा दिला होता. त्यामुळे जनतेनंही आपला निर्णय घेतला आता यातून राज ठाकरे यांनी योग्य धडा घ्यावा असा टोला अंबादा दानवे यांनी लगावला.

उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त होण्याच्या बाबतीत मनसे आणि वंचित बहुजन आघाडीसह अन्य काही पक्षांची स्थिती चिंताजनक राहिली आहे. दोन्ही पक्षांच्या जवळपास 96 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत 125 मतदारसंघात उमेदवार दिले होते. यापैकी 119 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने 200 मतदारसंघांत उमेदवार दिले होते. त्यापैकी 194 उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे.

हेही वाचा :

आत्मचिंतन करण्याची नवनिर्वाचितांना ही गरज

नाना पाटेकरांनी बादशाहच्या रॅपची उडवली खिल्ली? शोमध्ये गायकाची बोलती बंद!

डिसेंबर महिन्यात भरमसाठ सुट्ट्या, बॅंका किती दिवस बंद राहणार?