‘परदेस’ या पहिल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये(Entertainment news) पदार्पण केल्यानंतर महिमा चौधरीला रातोरात प्रसिद्धी मिळाली. मात्र नंतर महिमाची चित्रपट कारकीर्द फारशी यशस्वी झाली नाही. आता महिमा सोशल मीडियावर बरीच सक्रिय दिसते. सध्या महिमाची एक मुलाखत चर्चेता विषय ठरत आहे. यात तिने केलेल्या खुलाशाने खळबळ माजलीये.
इंडस्ट्रीतील(Entertainment news) तिच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना महिमा म्हणाली की, ज्या क्षणी तुम्ही एखाद्याला डेट करायला सुरुवात कराल, लोक तुम्हाला नाकारतील कारण त्यांना फक्त एक व्हर्जिन मुलगी हवी असते. जिने कधीही कोणाला किस केले नसेल, असा खुलासा महिमाने केला.
जर तुम्ही एखाद्याला डेट करत असाल तर असं होतं, ‘अरे! ती डेट करत आहे!’ जर तुम्ही लग्न केलं असेल तर विसरून जा, तुमचं करिअर संपलं आहे आणि जर तुम्हाला मुले असतील तर सर्व काही संपलं आहे, असं महिमाने सांगितलं.
महिमा चौधरी म्हणाली, ‘मला वाटतं की फिल्म इंडस्ट्री आता अशा परिस्थितीत येत आहे जिथे महिला कलाकारही त्यांचं चित्रीकरण करत आहेत. त्यांना चांगले भाग, पगार, जाहिराती मिळतात. त्यांच्याकडे पूर्वीपेक्षा जास्त शेल्फ लाइफ आहे.
महिमा ‘दिल क्या करे’ चित्रपटाचे चित्रीकरण करत होती. एक दिवस ती स्वत: गाडी चालवत सेटवर पोहोचत होती. त्यावेळी समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकने तिच्या गाडीला धडक दिली. या अपघातामध्ये महिमा गंभीर जखमी झाली. जवळपास 67 काचांचे तुकडे तिच्या चेहऱ्यावर रुतून बसले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
हेही वाचा :
‘चूक झाली असल्यास..’; राज ठाकरेंना मोठा धक्का!
“रोहित शर्माने सरफराजच्या पाठीत बुकी घातली! व्हायरल VIDEOची चर्चा रंगली”
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रिपद मिळणार? एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं…