’12th फेल’ या चित्रपटानंतर चाहत्यांच्या मनात घर करणारा बॉलीवूड अभिनेता(actor) विक्रांत मॅसीच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्याने केलेल्या सोशल मिडिया पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा निर्णय घेतलाय. अभिनेत्याची सिने कारकीर्द यशाच्या उच्च शिखरावर असतानाच त्याने थेट निवृत्तीचा निर्णय घेतलाय.
सध्या सिनेमागृहात विक्रांत मॅसीचा(actor) ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट चांगलाच गाजत आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याने ’12th फेल’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट दिलाय. या चित्रपटाने तर विक्रांतचं आयुष्यच बदलून टाकलं. विक्रांतला या चित्रपटासाठी अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत. अशात त्याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा रंगत आहे.
“माझ्यासाठी मागची काही वर्षे खूपच विलक्षण होती. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. पण, जसजसा मी आयुष्यात पुढे जात आहे, तसतसं मला जाणवतंय की, आता एक पती, वडील आणि अभिनेता म्हणूनही स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि घरी परतण्याची वेळ आली आहे,” असं विक्रांत मॅसीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पुढे त्याने लिहिलं, “योग्य वेळ येऊपर्यंत, येत्या 2025 मध्ये आपण एकदा एकमेकांना शेवटचं भेटू. शेवटचे दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी सोबत घेऊन सर्वांचे पुन्हा एकदा आभार. मी तुमचा कायम ऋणी राहीन.” विक्रांतने ही पोस्ट केल्यावर काही क्षणातच ती प्रचंड व्हायरल झाली. या पोस्टवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
तू भारतातील सर्वात चांगल्या अभिनेत्यांपैकी एक आहेस, त्यामुळे इंडस्ट्री सोडून जाऊ नकोस, असं काही चाहत्यांनी म्हटलं आहे. अभिनेत्री इशा गुप्ताने देखील विक्रांतच्या या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. तिने या पोस्टवर त्याचं नाव व रेड हार्ट इमोजी कमेंट केली आहे.
दरम्यान, छोट्या पडद्यावरील मालिकांमधून सिने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणाऱ्या विक्रांतने लुटेरा (2013) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एंट्री केली. पुढे त्याने हाफ गर्लफ्रेंड (2017), दिल धडकने दो अशा चित्रपटांत सहाय्यक भूमिका केल्या.तर, छपाक आणि गुंज मधील मुख्य भूमिकेनंतर तो सर्वांच्या नजरेत आला. हसीन दिलरुबा, डॉली किट्टी और वो चमकते सितारे. 12 th फेलअशा चित्रपटातील त्याच्या भूमिका देखील प्रसिद्ध झाल्या.अशात अभिनेत्याने थेट निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे.
हेही वाचा :
1 डिसेंबरपासून OTP सेवेवर परिणाम होणार?
‘त्यांना फक्त व्हर्जिन मुली….’; अभिनेत्रीच्या खुलाशाने एकच खळबळ
हत्येचा थरार, माजी उपसरपंचाचा दिवसाढवळ्या खून