सिनेविश्वातील(film industry) एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या राहत्या घरात पोलिसांना आढळून आला आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. ही अभिनेत्री टेलिव्हिजन सीरिअल्स आणि सिनेमांमधील आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते. तिच्या आत्महत्येच्या वृत्तामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
या वृत्तामुळे सिनेविश्वात(film industry) शोककळा पसरली आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कुणी नसून कर्नाटकमधील प्रसिद्ध टेलिव्हिजन स्टार शोभिता शिवन्ना आहे. विवाहित शोभिता शिवन्ना ही गेल्या दोन वर्षांपासून हैदराबादमध्ये राहत होती. मात्र, तिने आत्महत्या का केली असावी, याबाबत अजून कोणताच खुलासा झाला नाही.
पोलीस अधिकारी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासात शोभितानं आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अभिनेत्रीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.काही मीडिया रिपोर्टनुसार, शोभिताचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बंगळुरूला आणलं जाणार आहे.
कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. कोंडापूर येथील राहत्या घरी अभिनेत्रीने गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास देखील केला जात आहे.
अभिनेत्री शोभिता शिवन्नाने गेल्या काही वर्षांत अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केलंय. तिने 12 हून अधिक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे, ज्यात गलीपाता, मंगला गोवरी, कोगिले, कृष्णा रुक्मिणी, दीपावू निनादे गलीयू निनाडे आणि अम्मावरू यांसारख्या मालिकांचा समावेश आहे.
याचबरोबर अभिनेत्रीने एराडोंडाला मूरू, एटीएम, ओंडू काथे हेल्वा आणि जॅकपॉट यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.शोभिता शिवन्ना नुकतीच ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ या कन्नड चित्रपटात झळकली होती. अशात अभिनेत्रीने आत्महत्या केली की तिच्यासोबत घातपात झाला, याबाबत चर्चा आहेत. या प्रकरणी चाहत्यांकडूनही सोशल मीडियावर अनेक सवाल केले जात आहेत.
हेही वाचा :
1 डिसेंबरपासून OTP सेवेवर परिणाम होणार?
‘त्यांना फक्त व्हर्जिन मुली….’; अभिनेत्रीच्या खुलाशाने एकच खळबळ
तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची इच्छा; एकनाथ शिंदे म्हणाले…