मुंबई: भारतीय जनता पक्ष(politics), जगातील सर्वात मोठा पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यसारखे नेते असतानाही, एका गृहमंत्रीपदावरून महाराष्ट्राच सरकार लटकून पडलेलं आहे. हे कसले मजबूत लोक. तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे, अजित पवार आहेत, शिंदे गटाचे लोक आहेत की नाहीत मला माहिती नाही. पण ते भविष्यात काय करतील हेही सांगता येत नाही,अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. ते सकाळी माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, ” महायुतीकडे बहुमत असतानाही तुम्ही आठ-दहा दिवस शपथ घेत नाही. सरकार स्थापन होत नाही. राजभवनात सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी तयार नाहीत. समर्थक आमदारांची नावे द्यायला तयार नाहीत. राज्यपालांकडून सत्तास्थापनेची निमंत्रण न घेताच तुम्ही मांडवं घालयला सुरूवात केली. काय प्रकार आहे हा, पण हे एका गृहमंत्रिपदावरून थांबलेलं नाही.
भाजपने(politics) मनात आणलं तरी समोरच्यांच्या मागण्या एका मिनिटात चिरडून टाकतील. हे सगळे डरपोक लोक ईडी, सीबीआयला घाबरून गेलेले पळून गेलेले आहेत आणि जे निवडून आले ते स्वबळावर निवडून आलेले नाहीत. ते कसे निवडून आलेत ते भाजपला आणि त्यांनाही माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या स्वार्थामुळे आज, हिंदू धोक्यात आले आहेत. त्याला माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी फूस लावली. यामुळे देशातील शांतता आणि सुव्यवस्था भंग पावली. देशात निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी जी ठिणगी टाकली. त्याचा परिणाम फक्त भारतातील हिंदुंवरच नाही तर जगभरातील हिंदुंवर होत आहे. नेपाळ, बांगलादेश, कॅनाडा, पाकिस्तान या देशांमंध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत. याला जबाबदार मोदींची निवडणुका जिंकण्यासाठीची धोरणे आहेत.
हिंदुस्तानात सातत्याने दंगे घडवायचे, मुसलमानांना टार्गेट करायचं, प्रार्थनास्थळे खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे याचा उलटा परिणाम इतर देशातील हिंदुंवर होत आहे. पण बांगलादेशात जाऊन हिंदुंवरील हल्ले थांबवण्याची मोदी किंवा त्यांच्या सरकारमध्ये एवढी हिंमत नाही. कॅनडा किंवा अन्य देशात हिंदूवर होणारे हल्ले थांवण्याची त्यांच्यात हिमंत नाही. 1971 साली ज्यावेळी हिंदुंवर हल्ले होत होते.
त्यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी थेट भारतीय सैन्य पाकिस्तान घुसवून हल्ला केला. त्यांनी बांगलादेशींसोबतच तिथल्या हिंदुंचंही संरक्षण केलं. पाकिस्तानचे दोन तुकडे करूनत्यांनी बांगलादेश निर्माण केला. पण तुमच्यात ती हिंमंत आहे का, या देशातली धार्मिक एकता संपली आहे. संविधान, लोकशाही संपली आहे. त्यात बटेंगे तो कटेंगे अशा घोषणांमुळे तरूणांची माथी भडकवली गेली. संपूर्ण देशात दंगलीचं वातावरण निर्माण केलं गेलंय. बांगलादेशातील स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
हेही वाचा :
12th Fail फेम अभिनेत्याच्या चाहत्यांना धक्का!
थंडी गायब, राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?