अफवा पसरवाल तर याद राखा! आयोगाने डोळे वटारले!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मतदान यंत्रामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येत नाही, हे यापूर्वी सिद्ध झालेले आहे. पण तरीही या यंत्राबद्दल जाणीवपूर्वक बिन बुडाचे दावे केले जात आहेत. सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. अशा लोकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले जातील असा सज्जन इशारा निवडणूक(election) आयोगाने दिला आहे. त्यामुळे या मतदान यंत्राबद्दलच्या तक्रारी करण्याचे आता कोणी धाडस करेल असे वाटत नाही. निवडणूक आयोगाने अशा मंडळींच्या विरुद्ध डोळे वटारले आहेत हे योग्यच आहे असे म्हणावे लागेल.

भारत सरकारचे नियंत्रण असलेल्या “भिलाई” उद्योगात मतदान यंत्रे तयार केली जातात. जगभरातील 14 पेक्षा अधिक देशांनी भारतीय बनावटीची मतदान यंत्रे खरेदी केलेली आहेत. त्या देशांमध्ये या यंत्राबद्दल कोणत्याही प्रकारची तक्रार नाही किंवा शंकाही उपस्थित केल्या जात नाहीत. भारतासारख्या सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात बॅलेट पेपरवर मतदान घेणे शक्य नाही. जवळपास 97 कोटी मतदार आहेत. 56 लाख मतदान यंत्रे उपलब्ध आहेत.

मतदान प्रक्रिया जलद गतीने तसेच मतमोजणी त्याच गतीने करण्यासाठी मतदान यंत्राशिवाय अन्य पर्याय नाही. बॅलेट पेपरवर मतदान ही प्रचंड वेळ खाणारी प्रक्रिया आहे. कमी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये बॅलेट पेपर मतदानासाठी वापरणे योग्य ठरते.

राज्यात आणि देशात काँग्रेसची सत्ता असताना मतदान यंत्र हे मतदानासाठी वापरले जाऊ लागले आहे. तेव्हा विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत(election) काँग्रेसला भरघोस यश मिळत होते. मात्र तेव्हा विरोधी पक्षांनी मतदान यंत्रांबद्दल संशय व्यक्त केला नाही किंवा तक्रारही केली नाही. ही वस्तुस्थिती आहे.

‌‌ सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान यंत्रांच्या बद्दल संशय व्यक्त केला जात होता. पण तेव्हा महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर त्यांनी मतदान यंत्राबद्दल संशय व्यक्त करणारे वक्तव्य बंद केले.
‌ आता नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला पाचवी बहुमत मिळाल्यानंतर मतदान यंत्राबद्दल तक्रारी सुरू झाल्या. संशय व्यक्त केला जाऊ लागला. असा संशय व्यक्त करण्यात उद्धव ठाकरे शिवसेना आघाडीवर होती. त्यानंतर त्यांच्या सुरात सूर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडूनही मिसळला.

मतदान यंत्रा ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका(election) घ्याव्यात अशा याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या पण त्या तातडीने फेटाळण्यात आल्या. निवडणूक आयोग आणि मतदान यंत्र याबद्दल विरोधी पक्षांकडून जोरदार आक्षेप घेतले जाऊ लागल्यानंतर केंद्रीय निवडणूक तसेच राज्य निवडणूक आयोगाने त्याची गांभीर्याने दखल घेतली. मतदान यंत्राबद्दल गैरसमज पसरवणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध आयोगाने पहिला गुन्हा दाखल केला. त्यानंतर मतदान यंत्राबद्दल कुणी तक्रार केल्यास, संशय व्यक्त केल्यास तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवल्या तर निवडणूक आयोग गप्प बसणार नाही.

संबंधितांच्या वर गुन्हे दाखल केले जातील असा सज्जड दम आयोगाने दिला आहे. त्यामुळे आता मतदान यंत्राबद्दल संशय व्यक्त करण्याचे धाडस कोणी करेल असे वाटत नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः एक निवेदन प्रसिद्धीला देऊन मतदान यंत्र कोणालाही हॅक करता येत नाही. या यंत्राची छेडछाड करता येत नाही असे ठामपणे सांगितले आहे. एकूणच आता मतदान यंत्राबद्दल कोणालाही शंका घेता येणार नाही.

हेही वाचा :

मराठमोळा क्रिकेट IPL 2025 मध्ये करणार शाहरुख खानच्या KKR चं नेतृत्व?

शरद पवारांचा मोहरा ‘तुतारी’ खाली ठेवणार; वारं फिरताच पवारांना पहिला धक्का

गृहखातं पदरात पडलं की, भाजपचा गळा दाबायला शिंदेंना वेळ लागणार नाही; सुषमा अंधारे