राज्यात महायुतीला(political updates) घवघवीत यश मिळालं असल्याने पुन्हा की=एकदा महायुतीची सत्ता आली आहे. मात्र विधानसभा निकालानंतर खाते वाटप आणि मंत्रीपदासाठी चर्चा रंगत आहेत. मात्र भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने मुख्यमंत्री देखील भाजपचा होणार असल्याचे म्हटले जात आहे.
त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे(political updates) यांच्या ऐवजी श्रीकांत शिंदे राहणार असल्याच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र आता यासंदर्भात श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
खासदार श्रीकांत शिंदे म्हणले की, महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे राज्यात अनेक चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. परंतु काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे दोन दिवस ते गावी गेले होते. कारण त्यांनी त्या ठिकाणी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांवर अधिकच बहर आला आहे.
याशिवाय मी उपमुख्यमंत्री होणार? अशा बातम्या देखील गेली दोन दिवसांपासून येत आहेत. मात्र वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचं स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करत दिल आहे.
खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून आलेल्या स्पष्टीकरणामुळे उपमुख्यमंत्री पदाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर देखील मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हा देखील मंत्रिपदाला नकार दिला होता. तसेच सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नसल्याचं श्रीकांत शिंदेनी म्हंटल आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली
‘शिवशाही’ची चाकं थांबण्याच्या मार्गावर?; एसटीच्या भाडेवाढीसह अनेक निर्णय प्रस्तावित
“सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या यांचा धक्कादायक निर्णय, राजकीय वातावरणात खळबळ”