थेट 800 फुटांच्या नागफणी कड्यावरून अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार मुख्यमंत्री(political issue) व्हावेत यासाठी मावळातील तरुणांनी अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले आहे. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत व मावळचे आमदार सुनिल शेळके यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे अशा आशयाचा 30 फुटाचा मोठा बॅनर 800 फुट उंचीच्या लोणावळ्या जवळील नागफणी कड्यावरून झळकावून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

राज्याच्या विधानसभा(political issue) निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला असून महायुतीला बहुमत मिळालं आहे. अशातच मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, अशी चर्चा राज्यभर रंगली असतानाच अजितदादा भावी मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नागफणी कडा हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा लगतच्या घनदाट जंगलातील खड्या कातळ खडकाचा, चढाईला अतिशय दुर्गम व कठीण कडा आहे. असा हा कठीण असलेला ड्युक्स नोज उर्फ नागफणी कडा. गिर्यारोहणाचा अनुभव आणि सुरक्षित साधनांच्या साह्याशिवाय या सुळक्यावरील चढाई अवघड मानली जाते.

परंतु हा अवघड सुळका सर करून विकासाची दूरदृष्टी असलेल्या नेत्यांना मानाचे स्थान मिळावे हे ध्येय उराशी बाळगून जिद्द आणि धाडसाच्या जोरावर या युवा गिर्यारोहकांनी नागफणी सुळक्यावर बॅनर झळकावला आहे. या मोहिमेत मावळातील नारायण मालपोटे, नितीन पिंगळे, विशाल गोपाळे, अजित गोपाळे व पांडुरंग जाचक यांनी सहभाग घेतला होता.

आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत गिर्यारोहकांना खुणावणारे अनेक सुळके आपण पाहतो. या अवघड सुळक्यांवर गिर्यारोहक निसर्गाशी सामना करीत यशस्वीरीत्या चढाई करतात. अशाच सुमारे 800 फूट उंचीच्या नागफणी सुळक्यावर मावळातील तरुणांनी यशस्वीरित्या चढाई करून वाऱ्याच्या वेगाचा सामति 30 फुटी मोठा बॅनर झळकावला आहे.

दरम्यान, अजित पवार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत खातेवाटपासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या बातम्या असताना, दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या सागर या सरकारी निवासस्थानी भाजपचे महत्त्वाचे नेते दाखल होऊ लागले आहेत. चंद्रकात पाटील, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन, अनिल बोंडे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते सागर बंगल्यावर दाखल होऊ लागले आहेत.

20 नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने 288 पैकी 230 जागा जिंकून मोठा विजय नोंदवला होता. 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपला 132 तर शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा अद्याप ठरलेला नसताना, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 5 डिसेंबर रोजी मुंबईत नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार असल्याची घोषणा केली होती.

हेही वाचा :

राज्यातील ‘या’ लाडक्या बहिणींना महिलांना मिळणार नाहीत पैसे

उपमुख्यमंत्री होणार का? अखेर श्रीकांत शिंदेनी मौन सोडलं

“पैशांसाठी मी लोकांसोबत…”, ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रीने स्वतः दिली देहविक्रीची कबुली!