इंटरनेट आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये एक अविभाज्य भाग बनला आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल काहीही शोधायचे असेल तर आपण गुगलची मदत घेतो. सोशल मीडिया ब्राऊजिंग असो किंवा काही डाऊनलोड करायचं असेल. गुगलवरून(Google) कोणत्याही प्रश्नाची उत्तरे शोधणं असो किंवा नोकरी शोधणे असो, इंटरनेट आज आपल्याला अनेक प्रकारे मदत करते. पण काहीजण या गुगलचा गैरफायदा देखील घेतात. अशी एक घटना समोर आली.
अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये नेपाळी वंशाच्या नरेश भट्ट याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रिन्स विल्यम काउंटी कोर्टाने नरेश भट्ट याच्यावर त्यांची पत्नी ममता काफले भट्ट यांच्या हत्येप्रकरणी आरोप दाखल करण्यात आले. कोर्टाच्या नोंदीनुसार नरेश भट्ट यांच्यावर मृतदेह लपवल्याचाही आरोप आहे.
अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात राहणारे नेपाळी वंशाचे नरेश भट्ट याचे लग्न नेपाळी वंशाच्या ममता काफले भट्टसोबत झाले होते. जुलै 2024 मध्ये एके दिवशी ममता अचानक बेपत्ता झाली. नरेश यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास केला, मात्र बराच वेळ कोणताही सुगावा लागला नाही.मग अचानक एके दिवशी तपास करणाऱ्या पोलिसांना महत्त्वाचा पुरावा लागला. पोलिसांना नरेशचा एका जुना गुगल सर्च सापडला ज्यावरुन त्यानेच गुन्हा केल्याचं उघड झालं.
ममताच्या हत्येचं गूढ उकलणाऱ्या टीमला नरेशवर संशय आला. त्यामुळे त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटपासून त्याच्या इमेल्सपर्यंत सर्व गोष्टींचा शोध घेण्यात आला. कुठेही काही सापडले नाही. पण नंतर नरेशची गुगल सर्च हिस्ट्री तपासली असता एका सर्चने पोलीस टीमला आश्चर्याचा धक्का बसला. नरेशने गुगल (Google)बाबाला विचारला प्रश्न पाहुन सर्वांना धक्का बसला. पत्ता होण्याच्या काही महिने आधी नरेशने गुगलवर, “बायकोच्या मृत्यूनंतर किती दिवस पुन्हा लग्न करता येईल?” असं सर्च केलं होतं.
हा सुगावा पोलिसांच्या संशयाचे विश्वासात रुपांतर करण्यास पुरेसा होता. नरेशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण सत्य बाहेर आले. व्हर्जिनिया राज्य पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ममताचा मृतदेह घराच्या आत होता.तो ओढून घराबाहेर काढण्यात आला होता(Google). नरेशवर ममताचा मृतदेह लपवल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे. या हत्येचा तपास करण्यासाठी अमेरिकन कोर्टाने ‘ग्रँड ज्युरी’ स्थापन केली होती. या ज्युरीने आता आरोपपत्रही सादर केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे म्हणणे आहे की, हा आरोप त्यांच्या पत्नी ममता काफले भट्टच्या मृतदेहाचे तुकडे झाल्याचे दाखवणाऱ्या पुराव्याशी संबंधित आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ डिसेंबर रोजी होणार आहे.
ममता भट्ट नावाची नेपाळी वंशाची महिला जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बेपत्ता झाली होती. २९ जुलै रोजी त्यांचा फोन शेवटचा असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यावेळी पोलिसांनी ममताचे पती नरेश भट्ट यांची चौकशी केली. या चौकशीत नरेशने अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू केली. यावेळी नरेशने सांगितलेल्या अनेक गोष्टींवरून पोलिसांना संशय आला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने तपासासाठी एक पथक तयार केले.
पोलिसांनी सांगितले की, ‘भट यांच्या घराच्या मुख्य बेडरूममध्ये रक्ताचे डाग सापडले आहेत. कार्पेटवरही हलके डाग होते. बाथरुममध्येही बरेच रक्त दिसत होते.. काहीतरी ओढून नेल्यासारखं वाटत होतं. सरकारी वकिलाने न्यायालयाला सांगितले की, त्यांच्याकडे काही रेकॉर्डिंग आहेत, ज्यामध्ये नरेश भट्ट अनेकदा रात्री कारमधून प्रवास करताना दिसतात. यामध्ये तो कचऱ्याच्या पिशवीत काहीतरी फेकताना दिसत आहे. ममता बेपत्ता झाल्यानंतर हे रेकॉर्डिंग करण्यात आल्याचा आरोप आहे.
2 ऑगस्ट रोजी ममताच्या सहकाऱ्याने पोलिसांना कळवले की, ती 1 आणि 2 ऑगस्टला हॉस्पिटलमध्ये येणार होती, पण आली नाही. ती फोनही उचलत नसल्याचे सहकाऱ्याने सांगितले. तपासासाठी पोलिसांचे पथक नरेश आणि ममताच्या घरी पोहोचले(Google). मात्र नरेश भट्ट यांनी त्यावेळी बेपत्ता अहवाल लिहून घेण्यास नकार दिला. तीन दिवसांनंतर, त्याने ममता बेपत्ता झाल्याचा अहवाल लिहून घेतला आणि सांगितले की तो 31 जुलै रोजी रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर त्याच्या पत्नीला भेटला होता. पोलिसांनी घराची झडती घेतली आणि चौकशीनंतर 22 ऑगस्ट रोजी नरेश भट्टला अटक केली. सप्टेंबरमध्ये त्यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली, पण ती फेटाळण्यात आली.
नरेश आणि ममता दोघेही मूळचे नेपाळी असून ते अमेरिकेत राहत होते. 28 वर्षीय ममता यूव्हीए हेल्थ प्रिन्स विल्यम मेडिकल सेंटरमध्ये नर्स म्हणून काम करत होती. त्याच वेळी नरेश भट्ट हे यूएस आर्मीमध्ये राखीव स्वयंचलित लॉजिस्टिक विशेषज्ञ आहेत. जून 2017 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत त्यांनी काम केले. दोघांचेही सुमारे ४ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांनाही एक वर्षाची मुलगी नीमा आहे. ममताचे कुटुंबीय नेपाळमधील कावरेपाल्चोक जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले. तर नरेशचे कुटुंब कांचनपूरचे आहे.
हेही वाचा :
उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही? एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले….
‘पुष्पा 2’ मधील खलनायक फहाद फासिलचा ‘या’ अभिनेत्रीसह रोमान्स!
‘बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा अंतरिम सरकारची जबाबदारी’; अमेरिकन संसंदचे वक्तव्य