नागपूर: गेल्या पाच वर्षांपासून भारतीय जनता पक्ष(political news) ज्या दिवसाची वाट पाहत होता. अखेर तो दिवस आज उजाडला आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लाडके देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकनात शिंदे आणि अजित पवार हेदेखील आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती आहे. त्यासाठी कालच तीनही नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्ता स्थापनेचा प्रस्तावही सादर केला. त्यानंतर आज (5 डिसेंंबर) सांकाळी साडेपाच वाजता महायुतीचा शपथविधी होणार आहे.
यासोबतच महायुतीच्या(political news) गोटातून आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शपथविधीनंतर 16 डिंसेंबरपासून महायुतीच्या नव्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन येत्या 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. जवळपास एक आठवडा हे हिवाळी अधिवेशन चालेल, असेही सांगण्यात येत आहे.
अधिवेशनाची पूर्वतयारी करण्यासाठी विधिमंडळ सचिवालायचे कर्मचारी 10 डिसेंबरला नागपूरमध्ये दाखल होतील. 2014 ते 2019 या काळात मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी अनेक अधिवेशने गाजवली होती. विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी अनेक सत्ताधाऱ्यांनाही सडेतोड उत्तरे दिली. महायुतीने निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यान शेतकरी कर्जमाफी आणि वीज बिल माफीचा निर्णय घेणार असल्याचा आश्वासन दिले होते. त्यामुळे आता महायुती सरकार ही आश्वासने पूर्ण करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तत्पूर्वी, 7 डिसेंबरपासून मुंबईत महाराष्ट्र विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील आणि विधानसभा अध्यक्षांचीही निवड केली जाईल. त्यानंतर 7 आणि 8 डिसेंबर रोजी नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील, 9 डिसेंबरला विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक होईल. त्यानंतर तर, नागपुरात 16 ते 21 डिसेंबर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होईल.
हेही वाचा :
आमचं राजकीय करिअर शिंदेंच्या…; उदय सामंत यांचं मोठं विधान
एक दोनदा नाही तर अनेकदा प्रेमात पडतात ‘या’ जन्मतारखेचे लोक
सत्तास्थापनेनंतर पहिला निर्णय ‘लाडकी बहीण योजने’चा ; दीपक केसरकरांनी काय सांगितलं?