ऐश्वर्या रायबॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे, यात काही शंकाच नाही. ऐश्वर्याचे चाहते तिच्या सौंदर्यासोबतच अभिनयाच देखील भरभरून कौतुक करताना दिसतात. पण ऐश्वर्या तिच्या खासगी जीवनाबद्दलही तेवढीच चर्चेत राहिली. सलमान खान आणि(Entertainment news) विवेक ओबेरॉयोबतच अफेअर आणि आता द्वेषाने भरलेलं नातं आहे. विवेकने अनेक वर्षांनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्याच्या नात्याबद्दल मत व्यक्त केलं आहे. या नात्यातील विष त्याने पहिल्यांदा व्यक्त केलं आहे.
विवेक ओबेरॉय डॉ. जय मदानच्या युट्यूब चॅनलवर दिसला. जेथे त्याने एक कटू सत्य जगसमोर मांडल आहे. विवेक म्हणाला की, जर मला माझ्या आयुष्याचं उद्देश माहित नसतं, तर मी पण प्लास्टिकच्या म्हणजे बनावट चेहऱ्याच्या लोकांमध्ये मी पण तसंच तकलादू आयुष्य जगलो असतो. या मुलाखतीत (Entertainment news)विवेक ओबेरॉयने सलमान आणि ऐश्वर्यासोबत असलेल्या मतभेदांबद्दलही सांगितलं आहे. पुढे विवेक म्हणाला की, ‘देव त्याचं विशेष भलं करो.’ विवेकने या मुलाखतीत या नात्यातून तो कसं बाहेर पडला याबद्दलही सांगतो.
विवेक या मुलाखतीत सांगतो की, ‘कदाचित मी या नात्यात असतो तर एक विचित्र माणूस झालो असतो, विचित्र आयुष्य जगलो असतो. प्लास्टिकचा मुखवटा घालून फिरणाऱ्या लोकांमध्ये कदाचित मी स्वतः देखील तसाच बनावट बनलो असतो. आता लोकांनी मला ट्रोल केले तरी मला पर्वा नाही. कारण मला आयुष्यातील माझा उद्देश माहित आहे, मला माहित आहे की माझ्यासाठी सर्वात महत्वाचे काय आहे.
जेव्हा अभिनेत्याला त्याच्या माजी ऐश्वर्याचा पती अभिषेकबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने ज्युनियर बच्चनला एक अतिशय प्रिय व्यक्ती आणि चांगला माणूस म्हणून सांगितलं. विवेक आता व्यावसायिक जगतात एक नावाजलेले नाव बनले आहे आणि त्याने सांगितले की, त्याच्या आयुष्यात एक मोठा उद्देश आहे याचा मला आनंद आहे. त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून बाहेर पडल्याचा त्याला अभिमान आहे ज्याने तो उध्वस्त झाला. पण आता तो या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडला आहे.
हेही वाचा :
“दुसऱ्याच दिवशी मोठा निर्णय: राणे समर्थक आमदाराच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, आज राजभवनात शपथविधी”
यां 3 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
लाडक्या बहिणींचे 2100 रुपये कधी येणार? अर्ज छाननीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे विधान!